News

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत येणाऱ्या कृषि महाविद्यालय अकोला येथे गेल्या तीन ते चार दिवसांपासून

Updated on 26 March, 2022 2:08 AM IST

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत येणाऱ्या कृषि महाविद्यालय अकोला येथे गेल्या तीन ते चार दिवसांपासूनवार्षिक स्नेहसंमेलनाचा प्रचंड उत्साह सुरू होता त्यामध्ये वेगवेगळे मैदानी खेळ, स्पर्धा आयोजित केल्या होत्या . त्यानंतर शेवटच्या दिवसी दिनांक २५मार्च रोजी विविध स्पर्धेसह बक्षीस वितरण पार पडले .

यादिवशी बक्षीस वितरण करिता प्रमुख उपस्थिती म्हणून पोलीस निरीक्षक किशोर शेळके उपस्थित होते , तसेच डॉ. एस. एस. माने (सहयोगी अधिष्ठाता कृषि महाविद्यालय अकोला) व महाविद्यालयातील इतर शिक्षक वृंद आदी मान्यवर उपस्थित होते.

संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात बोलत असताना पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांनी वेगवेगळ्या स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व ते पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच सर्वांगिण विकासाकडे लक्ष केंद्रित करायला हवे. तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता यांनीसुद्धा स्पर्धेमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना आवाहन केले की हा पण ही खचून न जाता पुढच्या वेळेस यश मिळवण्याचा प्रयत्न करावा.

           स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी फॅशन शो, मिस्मॅच या स्पर्धा झाल्या.त्यानंतर लगेचच गायनाची स्पर्धा घेण्यात आली तेथेही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गायन केले.

व दुपारच्या वेळेत नाटक सादरीकरणाची स्पर्धा झाली , सगळ्या स्पर्धा झाल्यानंतर संध्याकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. त्यामध्ये विजेत्यांना प्रमाणपत्र व पारितोषिक प्रदान करण्यात आले , या मध्ये नृत्य स्पर्धेत एकाकी नृत्य सादरीकरणात विजेती कोमल बांदूरकर तसेच उपविजेती गरिशा वार यांना पारितोषिके देण्यात आले , नृत्य ( dute ) मध्ये विजेते ज्ञानेश्वरी कंकाळ व सरिता भगत , आणि उपविजेती जोडी अदिती अंभोरे व गरिशा वार ह्या ठरल्या .समूह नृत्य सादरीकरणात एन. सी. सी. समूह विजेते तसेच पंकज वंजारे आणि समूह ( भूतो की मेहफिल )हे उपविजेतते ठरले .

फॅशन शो मध्ये विजेती कोमल बांदुरकर व उपविजेता शांतनू मुंगळकर ठरले , मिस-मॅच या स्पर्धेत विजेता संचिन मानकर व उपविजेती विशाखा खराटे यांना पारितोषिके प्राप्त झाले , वादविवादमध्ये अनंत वर्मा विजेता तर राम चांडक व पार्थ खंडेलवाल हे उपविजेते ठरले, गायन स्पर्धेत उपविजेता ज्ञानेश्वर जाधव आणि कमलेश राठोड, क्विझ मध्ये पार्थ खंडेलवाल हा विजेता ठरला , कविता वाचन स्पर्धेत औवेस खान हा विजेता तर धनश्री व्यवहारे ही उपविजेती ठरली. दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाचा समारोप कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. तसेच आभार प्रदर्शन विद्यार्थी प्रतिनिधी शिवराज गिते यांनी केले.

त्यावेळी विध्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे शिक्षक वर्ग त्यामध्ये प्रामुख्याने डॉ. विरेंद्र ठाकूर,डॉ.भगत, डॉ. धुळे ,डॉ जेऊघाले, डॉ मोहन तोटावार, डॉ लांबे, डॉ शेळके डॉ. मारावार, विध्यार्थी प्रतिनिधि शिवराज गीते, विद्यार्थिनी प्रतिनिधी कांचन दुर्वे आदी उपस्थित होते.

प्रतिनिधी- गोपाल उगले

English Summary: ... So that was the end of the annual get-together
Published on: 25 March 2022, 10:47 IST