News

शासनाने इ पीक पाहणी प्रकल्प हा 15 ऑगस्ट पासून हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध प्रकारचा योजनांचा थेट लाभ मिळतो.

Updated on 17 January, 2022 1:55 PM IST

शासनाने इ पीक पाहणी प्रकल्प हा 15 ऑगस्ट पासून हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध प्रकारचा योजनांचा थेट लाभ मिळतो.

 परंतु ई पीक पाहणी  ॲप मध्ये संबंधित पिकांची माहिती भरताना काही तांत्रिक अडचणी तसेच बहुतांशी शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्यामुळे या प्रकल्पामध्ये काही समस्या निर्माण होत आहेत. या कारणामुळे राज्यातील 96 लाख 19 हजार 538 शेतकऱ्यांपैकी 66 लाख 6 हजार 893 शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांची माहिती व फोटो अपलोड केले आहेत.

म्हणजे जवळजवळ 30 लाख 12 हजार 642 शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारची माहिती अपलोड केली नसल्याचे समोर आले आहे.

 या प्रकल्पांतर्गत राज्यात एका प्रकारच्या पिकासाठी एक संकेतांक देण्यात आल्याने त्याच्या मदतीने गाव,तालुका, जिल्हा आणि विभाग नुसार कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र आहे, याची निश्चित आकडेवारी ई पीक पाहणी ॲप मुळे सहज उपलब्ध होणार आहे.तसेच शासनाच्या हमीभावानुसार कापूस, तूर,धानआणि हरभरा खरेदी इत्यादी योजणांसाठी पीकनिहाय लागवडीचे क्षेत्र व उत्पन्नाचा अचूक अंदाज काढता येईल. 

पिक कर्ज, पिक विमा भरण्याची व नुकसान भरपाई अदा करता येईल असे शासनाकडून सांगण्यात आले आहे. इतिया ॲपची उपयुक्तता असतानासुद्धा या आत मध्ये फोटो आणि माहिती अपलोड करताना तांत्रिक अडचणी येत आहेत.

English Summary: so many farmer in maharashtra ignore e pik pahaani project due to technical reason
Published on: 17 January 2022, 01:55 IST