News

भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७५ वा वर्धापन दिनाचे औचित्य साधून श्रीमती आनंदीबाई

Updated on 18 August, 2022 2:44 PM IST

भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७५ वा वर्धापन दिनाचे औचित्य साधून श्रीमती आनंदीबाई मालोकार कृषि तंत्र विद्यालय,निंबी मालोकार ता. जि. अकोला येथे दि.१३ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरूवात प्रभात फेरी काढून गावातील

सर्व नागरीकांना हर घर तिरंगा घोषवाक्य देवून राष्ट्रध्वज लावण्यास प्रोत्साहीत केले All the citizens were encouraged to hoist the national flag at every house by giving tricolor sloganतसेच डॉ. हेडगेवार रक्त पेढी, अकोला येथे विद्यालयामार्फत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीरामध्ये व्दितिय वर्षातील विद्यार्थ्यांनी स्वईच्छेन रक्तदान केले. देशभक्तीपर रांगोळी स्पर्धेमध्ये कु. कांचन अघडते हिने प्रथम तर कु.

संजना अडिकने हिने व्दितीय क्रमांक प्राप्त केला. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी विद्यालयाचे प्राचार्य श्री. वामनराव मोरे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले नंतर वकृत्व स्पर्धेमध्ये कु. कांचन अघडते हिने प्रथम तर कु. सपना खोंदील हिने व्दितीय क्रमांक प्राप्त केला. देशभक्ती गीतगायन स्पर्धेमध्ये कु. संजना

अडिकने हिने प्रथम तर कु. तृप्ती पाचपोर हिने व्दितीय क्रमांक प्राप्त केला. विद्यालयाचे प्राचार्य यांच्या हस्ते विजयी विद्याथ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले दिनांक १७ ऑगस्ट २०२२ सकाळी ११:०० वा सामुहीक राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले. सदर कार्यक्रमास विद्यालयातील

विद्याथी कर्मचारीवृंद व मजुरवर्ग बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन कु. कांचन अघडते हिने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. निलेश भगत कृषी सहायक, श्री गजानन सुरळकर कृषी सहायक, श्री. विनोद इंगळे शाखा सहायक व श्री. विजय निनोरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

English Summary: Smt. Anandibai Malokar Krishi Tantra Vidyalaya celebrated the Amrit Mahotsav of Independence in this manner
Published on: 18 August 2022, 02:44 IST