News

शेतकऱ्यांसह संपूर्ण देशवासियांसाठी आनंदाची बातमी आली आहे. देशात यंदा दुष्काळ (Drought) पडण्याची शक्यता नाही, सरासरीच्या ९८ टक्के पाऊस (Rain) पडेल, असा अंदाज स्कायमेट (Skymet) या खासगी हवामान संस्थेने मंगळवारी जाहीर केला आहे.

Updated on 12 April, 2022 2:45 PM IST

शेतकऱ्यांसह संपूर्ण देशवासियांसाठी आनंदाची बातमी आली आहे. देशात यंदा दुष्काळ (Drought) पडण्याची शक्यता नाही, सरासरीच्या ९८ टक्के पाऊस (Rain) पडेल, असा अंदाज स्कायमेट (Skymet) या खासगी हवामान संस्थेने मंगळवारी जाहीर केला आहे.

यंदाचा मान्सून सरासरीइतका म्हणजेच सर्वसाधारण असेल. जूनच्या सुरुवातीला मान्सूनची सुरुवात चांगली होईल. मॉन्सून हंगामाच्या पहिल्या टप्प्यात उत्तरार्धाच्या तुलनेत चांगले पाऊसमान राहील. जूनमध्ये मॉन्सूनची चांगली सुरुवात होण्याची शक्यता आहे, असे स्कायमेटने म्हटले आहे. तर देशभरात सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
थकीत ऊस बिलासाठी शेतकरी आक्रमक; थेट कारखानाच केला बंद
Milk FRP : दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक; नव्या संघर्षाचा आरंभ

जूनच्या सुरुवातीला मान्सूनची सुरुवात चांगली होईल. जुलै आणि ऑगस्टच्या मुख्य मान्सून महिन्यांत केरळ आणि उत्तर अंतर्गत कर्नाटकात पाऊस कमी पडेल. उत्तर भारतातील कृषी क्षेत्र महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या पावसावर आधारित भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल. त्याचबरोबर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल.

एकूण सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस हा सरासरीइतका म्हणजेच सर्वसाधारण मानला जातो. त्या तुलनेत पावसाची ९८ टक्के शक्यता आहे. स्कायमेटने दिलेल्या अंदाजानुसार मणिपूर, नागालँड, मिझोराम राजस्थान, गुजरात, आणि ईशान्येकडील त्रिपुरा सोबतच संपूर्ण हंगामात पावसाच्या कमतरतेची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
जनावरांच्या पोटातील जंत किडे निघून जातील; जाणून घ्या काय आहे 'हे' औषध
ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांनी दागिने गहाण ठेवून पैसे दिले, पैसे परत द्या नाहीतर साखर कारखान्यावर मोर्चा, स्वाभिमानीचा इशारा

English Summary: Skymet : Observatory predicted; Monsoon will be like this in Maharashtra
Published on: 12 April 2022, 02:43 IST