मराठा तरुणांनी अभ्यास करून विचार करून आपण कोणाला साथ देत आहे, आपला भलं कशात आहे, हित कशात आहे, याचा विचार करावा असे वक्तव्य विजय वड्डेट्टीवार यांनी केले आहे. यावर प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे म्हणाले की, आम्हाला मोडायचा सामूहिक कट तुम्ही रचला होता. आता फालतू शब्द बोलून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करत आहात. पण आमची मुलं दूधखुळी नाहीत, मराठ्यांचे मुडदे पडायला तुम्ही जबाबदार आहात, आता तुमच्या सल्ल्याची सुद्धा गरज नाही, असे जरांगे म्हणाले आहेत.
तसेच विजय वड्डेट्टीवार आणि इतर राजकीय नेत्यांना इशारा देत जरांगे म्हणाले की, तुम्ही काय चीज आहे, हे आम्हाला आता कळले, तुम्ही 5 ते 6 जण काय नमुने आहेत, हे आम्हाला कळलं. त्यामुळे तुम्ही आता आमचे मराठ्यांचे शत्रू झालात. मराठा समाजाचे वाटोळं करणाऱ्या त्या 6 जणांचे नाव 24 तारखेला सांगतो, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला सरकसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच मराठ्यांचा ओबीसीत समावेश करण्याची मागणीही मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मात्र त्यांच्या या मागणीला ओबीसी नेते विरोध दर्शनत आहेत,त्यासाठी आंदोलनाचा इशाराही ओबीसी नेत्यांनी दिला आहे. त्याचसोबत मराठा आरक्षणाच्या विरोधकांची पोलखोल करणार असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
Published on: 10 November 2023, 04:19 IST