News

जाणून घेऊ सिमरन फळाविषयी सिमरन फळाचा विचार केला तर हे फळ दिसायला साधारण दहा टोमॅटो फळ सारखेच दिसते. चवीला गोड असून खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळते.

Updated on 25 September, 2021 4:32 PM IST

जाणून घेऊ सिमरन फळाविषयी

सिमरन फळाचा  विचार केला तर हे फळ दिसायला साधारण दहा टोमॅटो फळ सारखेच दिसते. चवीला गोड असून  खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळते.

हे फळ सुरुवातीच्या काळात हिरवळ किंवा पिवळसर रंगाचे असते. पूर्ण पिकल्यावर त्याचा रंग लाल होतो. त्यामुळे रस्त्याच्या रंगावरुन ते ग्राहकांचे लक्ष वेधून घेते.हे फळ प्रामुख्याने शिमला येथून येत असल्याने त्याला सिमरन म्हणून ओळखले जाते.

 जर त्यातील जीवनसत्त्व आणि पौष्टिक  गुणांचा विचार केला तर अनेक जीवनसत्व असलेले हे फळ तोरणा काळामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बऱ्या प्रमाणात वापरले गेल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. उत्तर प्रदेश राज्यातील पावसाळ्यात  आंबे संपल्यावर फळ बाजारांमध्ये सिमरन फळांचा हंगाम सुरू होतो.  सम्राट फळाचा हंगामाचा विचार केला तर तो सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान असतो.मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये मागील काही दिवसांपासून सिमरन फळांची आवक चांगली होत आहे.

हे फळ कुलू-मनाली येथून येत असून एपीएमसी मार्केटमध्ये साधारण 1200 ते 1800 बॉक्सची आवक होत आहे. एक बॉक्स हा बारा-चौदा किलोचा असतो.सिमरन फळाचादराचा विचार केला तर एका बॉक्सला कॉलिटी नुसार बाराशे ते अठराशे रुपये भाव मिळत आहे.

English Summary: simran fruit come in mumbai apmc market
Published on: 25 September 2021, 04:32 IST