बदलत्या काळानुसार शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणे महत्वाचे ठरत आहे. सध्या राज्यातील अनेक शेतकरी पारंपारिक पीक पद्धतीत बदल घडवून आणत आहेत आणि नवनवीन पिकांची लागवड करून दर्जेदार उत्पन्न प्राप्त करीत आहेत. असे असले तरी अद्यापही राज्यातील शेतकरी आधुनिक शेतीची कास धरण्यासाठी जागृक नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे. शेतकरी बांधव नवीन पीक पद्धतीचा अवलंब करण्यासाठी धाडस करताना दिसत नाही. राज्यात आता मोठ्या प्रमाणात रेशीम चे उत्पादन शेतकऱ्याद्वारे घेतले जात आहे मात्र अजूनही रेशीम शेतीसाठी मोठा वाव आहे. सध्या राज्यात 17 हजार 595 एकर क्षेत्रावर तुतीची लागवड झाली असल्याचे सांगितले जात आहे, या एवढ्या मोठ्या क्षेत्रापैकी निम्म्याहून अधिक क्षेत्र एकट्या मराठवाड्यात नमूद करण्यात आले आहे.
मराठवाड्यात 8 हजार 928 एकर क्षेत्रावर तुतीची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रेशीम उत्पादनात मराठवाड्याचा मोठा सिंहाचा वाटा आहे. रेशीम शेती हळूहळू पश्चिम महाराष्ट्रात देखील आपले पाय पसरवीत आहे, आणि रेशीम शेती पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी देखील लाभदायी सिद्ध होत आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रेशीम कोषाला 68 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल असा विक्रमी दर प्राप्त झाला आहे. रेशीम कोषाला प्राप्त झालेले विक्रमी दर रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठे फायद्याचे सिद्ध होत आहे. त्यामुळेच राज्यातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीसाठी सरकार द्वारे प्रोत्साहित देखील केले जात आहे. रेशीम शेतीचे क्षेत्र राज्यात झपाट्याने वाढताना दिसत आहे त्यामुळे रेशीम संचालनालयाच्या मार्फत रेशीम कोषासाठी बाजारपेठा देखील उपलब्ध करून दिल्या जात आहेत. संचालनालयामार्फत मराठवाड्यातील जालना बीड यांसारख्या शहरात रेशीम कोषाला मोठ्या बाजारपेठा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यामुळे मराठवाड्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना जवळ बाजारपेठ उपलब्ध झाली आहे त्यामुळे त्यांचा वाहतुकीचा खर्च वाचत असून उत्पन्नात वाढ होत असल्याचे सांगितले जात आहे.
सध्या देशात सर्वत्र रेशीम कापडाला विशेष मागणी आली आहे त्यामुळे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना रेशीम शेती फायदेशीर सिद्ध होत आहे. यामुळे रेशीम उत्पादक शेतकर्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत असल्याचा दावा देखील केला जात आहे. राज्यात रेशीम शेतीत दिवसेंदिवस रात दोगुनी दिन चौगुनी प्रगती होत असल्याने राज्याने रेशीम शेतीत एक नवीन कीर्तीमान प्रस्थापित केला आहे. रेशीम शेतीला चालना देण्यासाठी राज्य सरकार द्वारे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत, यापैकी एक आहे महारेशीम अभियान.
शेतकऱ्यांना याद्वारे रेशीम लागवडीपासून ते काढणीपर्यंत संपूर्ण प्रशिक्षण देण्याचे कार्य केले जात आहे. रेशीम शेती भविष्यात शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता प्राप्त करून देण्यास मोलाचा वाटा उचलू शकते. रेशीम कोषाला प्राप्त होत असलेले विक्रमी दर रेशीम शेतीसाठी शेतकऱ्यांना आकर्षित करतील एवढे नक्की. संदर्भ टीव्ही9भारतवर्ष
Published on: 28 January 2022, 06:17 IST