नवरात्री हा महत्त्वाचा सण असुन तो अनेक देशांमध्ये साजरा केला जातो. यावर्षीचा नवरात्री उत्सव 15 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर 2023 या कालावधीत होणार आहे. नवरात्र उत्सव म्हणजे आदि शक्तीचा जागर करण्याचे नऊ दिवस. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. या 9 दिवसांमध्ये 9 वेगवेगळ्या रंगांचे विषेश महत्त्व आहे. ते आज आपण जाणुन घेणार आहोत.
रंगांचे विषेश महत्त्व-
15 ऑक्टोबर - नारंगी रंग
नारंगी रंगाचे कपडे परिधान करून शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, घटस्थापनेसोबत शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. देवीला केशरी रंग आवडतो तसेच हा रंग सकारात्मक उर्जेने भरलेला असतो.
16 ऑक्टोबर - पांढरा रंग
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पुजा केली जाते. या दिवशी पांढऱ्या वस्त्रांमुळे देवीसोबतच भोलेनाथाचा आशीर्वाद प्राप्त होतो. पांढरा रंग शांतता, शुद्धता,साधेपणा आणि सुरक्षिततेची भावना देतो.
17 ऑक्टोबर - लाल रंग
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. लाल रंग हा दुर्गेचा आवडता रंग मानला जातो. लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक असुन भक्तांना शक्ती देतो.
18 ऑक्टोबर - गडद निळा रंग
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी गडद निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. नवरात्रोत्सवादरम्यान गडद निळा रंग सुख समृद्धी आणि शांततेची अनुभुती देतो.
19 ऑक्टोबर - पिवळा रंग
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. या दिवशी रंग परिधान केल्या जातो. पिवळ्या रंगाने मन आशावादी आणि आनंदी राहते.
20 ऑक्टोबर शुक्रवार - हिरवा रंग
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी माता कात्यायनीची पूजा केली जाते. या दिवशी हिरवा रंग परिधान केल्या जातो. हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक असुन वाढ,शांतता निर्माण करतो.
21 ऑक्टोबर - राखाडी रंग
नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची पूजा केली जाते.या दिवशी राखाडी रंग परिधान केल्या जातो. राखाडी रंग संतुलित विचारांचे प्रतीक असुन व्यावहारिक आणि साधे राहण्यासाठी हा रंग प्रेरित करतो.
22 ऑक्टोबर रविवार- जांभळा रंग
नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते. या दिवशी जांभळा रंग परिधान केल्या जातो. हा रंग भव्यता दर्शवतो, त्यामुळे भक्तांना सुख-समृद्धी मिळते.
23 ऑक्टोबर - मोरपंखी रंग
नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते. या दिवशी मोरपंखी रंग परिधान केल्या जातो. हा रंग विशिष्टता आणि व्यक्तिमत्व दर्शवतो.या रंगामुळे समृद्धी आणि नवीनतेचा लाभ मिळतो.
Published on: 14 October 2023, 04:50 IST