नवी दिल्ली: केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी नवी दिल्ली येथे फिरत्या मधमाशा पालनगृहाला हिरवा झेंडा दाखवला. मधमाशा पालनात अनेक आव्हाने असतात. या उपक्रमांमुळे मधमाशा पालन सुलभ होईल असे गडकरी यांनी यावेळी सांगितले.
मधमाशा पालन करणाऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठीचा समग्र दृष्टीकोन फिरत्या मधमाशा पालनगृहाच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष व्ही.के.सक्सेना यांनी सांगितले.
प्रायोगिक तत्वावर फिरते मधमाशा पालनगृह दिल्लीच्या सीमेवर मोहरीच्या शेतांजवळ तैनात करण्यात येणार आहे. यशस्वी अंमलबजावणीनंतर देशभरात ही संकल्पना राबवली जाणार आहे.
Published on: 18 February 2020, 09:28 IST