News

देशात सध्या महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे केंद्र सरकार विरोधात असंतोष वाढत आहे. असे असताना आता संसदेच्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. खासदारांची भाषणे यावेळी व्हायरल होत आहेत. असे असताना आता असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Updated on 02 August, 2022 4:52 PM IST

देशात सध्या महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे केंद्र सरकार विरोधात असंतोष वाढत आहे. असे असताना आता संसदेच्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. खासदारांची भाषणे यावेळी व्हायरल होत आहेत. असे असताना आता असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये अधिवेशनात महागाईच्या प्रश्नावर चर्चा सुरु असताना एका महिला खासदाराने बॅग लपवल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. पावसाळी अधिवेशनात महागाईवरून मुद्यावरून विरोधीपक्ष सरकारवर टीका करत आहे. यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार महुआ मोईत्रा लुई व्हिटॉन बॅग लपवताना दिसल्या आहेत. हा सर्व प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. तृणमूलच्या काकोली घोष हस्तकलेच्या महागाईवर बोलत होत्या. यावेळी तिच्या शेजारी बसलेल्या महुआ मोईत्रा त्यांची लुई व्हिटॉन बॅग सीटवरून खाली ठेवली. या बॅगेची किंमत 1.5 लाख रुपये आहे.

२०२४ ला पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असणार? अमित शहांनी केली 'या' बड्या नावाची घोषणा..

यामुळे सोशल मीडियातून त्यांच्यावर टीका होत आहे. दरवाढीच्या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल करणाऱ्या तृणमूलचे खासदार एवढी महागडी बॅग कशी बाळगू शकतात, असा प्रश्न विचारला जात आहे. यामुळे महागाई फक्त सर्वसामान्य लोकांनाच आहे, हे दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो आता इनवेल बोअरिंगसाठी मिळणार २० हजार रुपये, असा घ्या लाभ..
pakistan news; आता पाकिस्तानही झाला कंगाल, देशावर आली आतापर्यंतची सर्वात वाईट वेळ, कोणी कर्जही देईना
'फक्त ११ लाखांसाठी त्रास दिला जातोय'

English Summary: should be hidden!! MP hid purse of 1.5 lakhs while discussing inflation LokSabha
Published on: 02 August 2022, 04:52 IST