सध्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर गव्हाला मागणी वाढली आहे. तसेच पुरवठा कमी असल्यानं किंमतीत वाढ होत आहे. गेल्या तीन आठवड्यांत किंमतीत क्विंटलमागे 50 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे आता नवीन गहू बाजारात येईपर्यंत किमतीत वाढ राहण्याची शक्यता आहे. सध्या सर्वात मोठं गहू (Wheat) उत्पादक राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये गव्हाची चंटाई निर्माण झाली आहे.
त्यामुळं तिथे गव्हाच्या किंमतीत (Wheat prices) वाढ झाली आहे.बिहारमध्ये देखील हीच परिस्थिती आहे. गव्हाच्या किंमतीत वाढ झाली आहे. इतर राज्यांच्या तुलने उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गव्हाच्या किंमतीत 4 ते 5 टक्क्यांची वाढ झाली आहे. या दोन्ही राज्यांना प्रथमच गव्हाच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे आता सरकारकडून हालचाली होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, निर्यातबंदीनंतर गुजरात बंदरांवर मोठ्या प्रमाणात गहू अडकून पडला आहे. पुढील वर्षी जानेवारीपर्यंत देशांतर्गत पुरवठ्यावर परिणाम होऊन भारतीय बाजारपेठेतील गव्हाची उपलब्धता आणखी घसरेल अशी व्यापाऱ्यांनी माहिती दिली आहे. यामुळे अनेक व्यापारी आता साठा देखील करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुण्यात तीन दिवसीय डेअरी कार्यशाळेचे आयोजन, शेतकऱ्यांनो एकदा भेट द्याच
तसेच संक्रांतीपर्यंत गव्हाचा साठा चिंताजनक पातळीवर कमी होईल अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे. गव्हाची आयात करुन संकट टाळता येत नाही, कारण आयात बाजारात पोहोचण्यासाठी जवळपास तीन महिने लागतात. केंद्र सरकारकडून प्रथमच गव्हाची उपलब्धता न होणं आणि निर्यातीसाठी सर्व अतिरिक्त गहू पाठवणे यामुळं गव्हाच्या किंमती पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये तुलनेने जास्त आहेत.
लसीकरणानंतरही जनावरांना लम्पीची लागण, शेतकऱ्यांची चिंता वाढली..
उत्तरेकडील राज्यांमध्ये गव्हाला मोठी मागणी आहे. यामुळे आता हे वाढलेले दर कमी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येणाऱ्या काळात यावर स्थिरता आणण्यासाठी सरकारकडून काय प्रयत्न केला जाणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
यंदा अतिरिक्त उसाचा प्रश्न मिटणार? ३५ साखर कारखान्यांनी घेतली ऊस गाळप सुरू करण्याची परवानगी
बारामतीत मुसळधार पावसाचे थैमान, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
सरकार देशातील सर्व पंचायतींमध्ये सहकारी डेअरी उघडणार, अमित शहा यांची माहिती
Published on: 13 October 2022, 06:12 IST