News

कधी अतिवृष्टी, कधी अवकाळी तर ढगाळ वातावरण, वातावरणात होणारे अचानक बदल इत्यादी नैसर्गिक संकटामुळे अगोदर शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यातच काही मानवनिर्मित संकटे देखील शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायला तयार नाहीत.

Updated on 05 February, 2022 12:05 PM IST

कधी अतिवृष्टी, कधी अवकाळी तर ढगाळ वातावरण, वातावरणात होणारे अचानक बदल इत्यादी नैसर्गिक संकटामुळे अगोदर शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यातच काही मानवनिर्मित संकटे देखील शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायला तयार नाहीत.

पेरणीची  वेळ आली कि बियाण्यांची टंचाई पिकांना खते द्यायची वेळ आली तर खताचा तुटवडानेमकी कधी सुरळीत होईल ही सगळी परिस्थिती याचे उत्तर नेमके कोणालाच देता येत नाही. असाच काहीसा प्रकार नाशिक जिल्ह्यातील सायखेडा येथे घडला आहे. या भागामध्ये गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून खतांचा तुटवडा जाणवत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त होते. अशातच येथील एका दुकानांमध्ये खते आल्याची माहिती शेतकऱ्यांना मिळाली आणि चक्क दुकान उघडायचे अगोदर शेतकऱ्याने सकाळपासून रांग लावली. या  रांगेत  जवळजवळ पाचशे शेतकरी जमा झाले.

परंतु विक्रेत्याने ही गर्दी पाहून तो घाबरला. कारण आलेले खत आणि ते घेण्यासाठी जमलेली शेतकऱ्यांची गर्दी यामध्ये खूपच मोठा फरक असल्याने गोंधळ निर्माण होईल अशी शक्यता असल्याने त्यांनी पोलिसांना पाचारण केले. संबंधित दुकानदाराकडे डीएपी खताच्या दोनशे बॅगा व 10:10:26या खताच्या  दोनशे बॅग आलेल्या होत्या. त्यामुळे रांगेमध्ये असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला एक बॅग दोन बॅग अशा पद्धतीने वाटप करण्यात आली. कारण ही वेळ रब्बी हंगामातील कांदा,ऊस, मका आणि हरभरा सारख्या पिकांना खते देण्याची असल्याने आणि त्यातच वेळेत खतांचा पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने पिकांना खते वेळेवर मिळत नाहीत.त्यामुळे शेतकरी दररोज दुकानदारांकडे याबाबत चौकशी करतात. 

जर एखाद्या खता विक्रेत्याकडे खत आले तर अशा पद्धतीने गर्दी जमा होते. अशा दिवसभर उपाशीतापाशी राहून  शेतकऱ्यांना खताची प्रतीक्षा करावी लागत आहे.तसेच खतांच्या किमती मध्ये दुप्पट वाढ झाल्यामुळे पिकांच्या उत्पादन खर्च देखील वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असून शासनाने कमीत कमी रासायनिक खते तरी वेळेत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

English Summary: shortage of chemical fertilizer is big problem so farmer so anxiety
Published on: 05 February 2022, 12:05 IST