वातावरणात सतत होणार बदल फक्त भारत देशाला च न्हवते तर पूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनलेला आहे. आयपीसीसी ने वर्तवलेला हा अंदाज चिंतेचा विषय बनलेला आहे. २०२२ च्या सहाव्या मूल्यांकनात जो अहवाल आयपीसीसी ने जाहीर केला त्यामध्ये पुढील काही वर्षात वातावरणाचा परिणाम शेतीव्यवसायावर काय होणार आहे जो की आपणास कशाचा सामना करावा लागणार आहे हे यामध्ये उल्लेख केलेला आहे. या वातावरणाचा सर्वात जास्त परिणाम भारत देशावर होणार आहे. भारतातील लोकसंख्या ही शेतीव्यवसायावर च अवलंबून आहे. सतत बदलत्या हवामानामुळे समुद्राची पातळी वाढणार आहे असे या अहवालात म्हणले आहे. पाण्याची पातळी वाढली की जमीन पाण्याखाली जाणार आहे तसेच किनारपट्टीचा जो भाग आहे त्यास पुराचा सामना करावा लागणार आहे. खारे पाणी शेतात शिरणार आहे ज्यामुळे शेतीयोग्य जमीन खराब होणार आहे. एकदा जमीन खराब झाली की मका तसेच इतर पिकांच्या उत्पादनात घट होणार आहे.
आर्थिक नुकसानीचाही करावा लागणार सामना :-
भारत देशातील किनारपट्टी लगतच्या ३ कोटी ५० लाख नागरिकांना पुराचा सामना करावा लागणार आहे. जर पाण्याचे उत्सर्जन मोठ्या प्रमाणात झाले तर २१ व्या शतकाच्या अखेरीस भारतातील सुमारे ४ कोटी ५० लाख नागरिकांना धोका निर्माण होणार आहे असे आयपीसीसी ने अहवालात सांगितले आहे. समुद्रात पाण्याची वाढणारी पातळी आणि नदीला आलेल्या पुराणे भारताचे मोठे नुकसान होणार आहे. जर हे सर्व आटोक्यात आणले नाही तर बर्फाची चादर तयार होईल आणि भारताला २ लाख ७२ हजार कोटी रुपयांचे नुकसान झेलावे लागणार आहे.
तापमानात होणार वाढ :-
सततच्या वातावरण बदलामुळे भारताला उन्हाचा सामना करावा लागणार आहे जे की आयपीसीसी ने जो अहवाल दिला आहे त्या अहवालात या तापमानाला " बल्ब तापमान " असे नाव देण्यात आले आहे. ३१ अंश असा तापमानाचा आकडा आहे. भारतातील अनेक भागांमध्ये ओल्या बल्बचे तापमान २५ ते ३० अंश सेल्सिअस आहे. मात्र या शतकाच्या अखेरीस लखनऊ व पटनामध्ये ओल्या बल्बचे तापमान ३५ अंश सेल्सिअस पर्यंत पोहचेल. जर वातावरणात जास्त बदल झाला तर भुवनेश्वर, चेन्नई, इंदूर आणि अहमदाबादामधील ओल्या बल्ब चे तापमानात वाढ होणार आहे.
पिकांच्या उत्पादनावरही होणार परिणाम :-
Weather.com ने दिलेल्या माहितीनुसार तापमानात वाढ होणार आहेत पण त्यासोबतच थंडी आणि पाऊस सुद्धा वाढणार आहे जे की यामुळे पिकांचे उत्पादन घटणार आहे. जर तापमानात वाढ होत गेली तर जगातील पिकांचे नुकसान होणार आहे आणि सर्वात जास्त फटका भारताला सहन करावा लागणार आहे. २०५० सालापर्यंत तांदूळ, गहू, डाळी व धान्याच्या उत्पादनात ९ टक्केनी घट होणार आहे. तर दक्षिण भारतातील मका पिकात १७ टक्के नी घट होणार आहे त्यामुळे देशातील अन्नधान्याचे भाव वाढतील.
Published on: 09 March 2022, 11:19 IST