News

राज्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढतच चालले आहे. शेतीत होत असलेले नुकसान आणि वाढत जाणारे कर्ज यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या विवंचनेतून शेतकऱ्यांनी जीवन संपवत आहे. आता एनसीआरबी संस्थेने धक्कादायक अहवाल दिला आहे. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात 22,746 आत्महत्या झाल्याची नोंद झाली आहे.

Updated on 05 December, 2023 11:25 AM IST

राज्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढतच चालले आहे. शेतीत होत असलेले नुकसान आणि वाढत जाणारे कर्ज यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या विवंचनेतून शेतकऱ्यांनी जीवन संपवत आहे. आता एनसीआरबी संस्थेने धक्कादायक अहवाल दिला आहे. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात 22,746 आत्महत्या झाल्याची नोंद झाली आहे.

एनसीआरबी अहवालानूसार राज्यात दिवाळखोरी किंवा कर्जबाजारीपणामुळे 1941 आत्महत्या झाल्या आहेत. त्याचबरोबर राज्यात बेरोजगारीमुळे 642, गरिबीमुळे 402 आणि व्यावसायिक जीवनातील समस्यांमुळे 640 नागरीकांनी आत्महत्या केली आहे. तसेच गेल्या वर्षभरात राज्यात कौटुंबिक कारणांमुळे आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याची नोंद अहवालात आहे. कौटुंबिक कारणांमुळे 6961 आत्महत्या झाल्या आहेत.

देशात महाराष्ट्र सर्वाधिक आत्महत्याग्रस्त राज्य असून त्यापाठोपाठ तामिळनाडूमध्ये 19,834 लोकांनी आत्महत्या केल्या आहे. देशात 2022 मध्ये 1,70,924 आत्महत्या झाल्या आहेत. यापैकी सर्वाधिक आत्महत्यांचा आकडा महाराष्ट्रात 13.3 टक्के, तामिळनाडूमध्ये 11.6 टक्के, मध्य प्रदेशमध्ये 9, कर्नाटकमध्ये 8 नोंदवला गेला आहे. या आकडेवारीनूसार सरासरी काढल्यास 2022 मध्ये देशात दर तासाला 19 लोकांनी आत्महत्या केल्याचे समजते. तसेच शेती क्षेत्रात दर तासाला एकापेक्षा जास्त शेतकरी आणि शेतमजूर आत्महत्या करतात.

English Summary: Shocking NCRB report; Maharashtra is the state with the highest number of suicides in the country
Published on: 05 December 2023, 11:25 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)