मागील काही दिवसात मान्सूनमुळे हवामानात कमालीचा बदल झालेला बघायला मिळत आहे. शिवाय हवामान खात्याने अनेक राज्यात पावसाची शक्यता वर्तवली होती. काल म्हणजेच गुरुवारी बिहारच्या अनेक भागांत वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने कहर केला आहे. यात आर्थिक नुकसानीबरोबरच जीवितहानीदेखील मोठ्या प्रमाणावर झाली आहे.
बिहारमधील अनेक भागांत जवळजवळ 25 ते 60 किमी प्रतितास वेगाने वादळ आले आणि अगदी काही वेळातच जोरदार पावसाला सुरुवात झाली. तसेच काही ठिकाणी गाराही पडल्या. यामध्ये तब्बल 25 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच बोटी बुडाल्याची देखील बातमी समोर आली आहे. एकंदरीत राज्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे
मृतांमध्ये मुझफ्फरपूरमधील पाच, भागलपूरमधील चार, लखीसराय-सारणमधील प्रत्येकी तीन, मुंगेरमधील दोन तसेच जमुई, बांका, बेगुसराय, खगडिया, पूर्णिया, नालंदा, जेहानाबाद आणि अररिया येथील प्रत्येकी एक असा समावेश आहे. वादळी वाऱ्यामुळ अनेक ठिकाणी कच्ची घरे व झाडे उन्मळून पडली आहेत. परिणामी वाहतुक कोंडी तसेच वीजपुरवठादेखील खंडित झाला होता.
एकचं नंबर! आता महाराष्ट्राच्या आंब्याची चव चाखणार जो बायडेन; सुप्रिया सुळे म्हणाल्या...
वादळामुळे आंबा, लिची, मका, मूग, भाजीपाला आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान पाटण्यातील मणेर येथे वाळू वाहून नेणाऱ्या पाच बोटीदेखील गंगेत बुडाल्याची धक्कादायक गोष्ट घडली आहे. या बोटीत जवळपास 50 मजूर होते. मात्र त्यांनी पोहून आपला जीव वाचवला आहे. वातावरणातील आर्द्रता-समृद्ध हवेचा प्रवाह, तापमानात झालेली वाढ तसेच मध्य बिहारमधून ट्रफ लाइन गेल्यामुळे वादळ आणि पाऊस झाला असल्याचं हवामानशास्त्रज्ञांनी सांगितलं आहे.
विमा कंपन्या शेतकऱ्यांसाठी वरदान की शाप, धक्कादायक प्रकार आला समोर
राज्यात मान्सूनपूर्व हालचाली सक्रिय झाल्या असून गेल्या अनेक दिवसांपासून पूर्वेकडील प्रवाहामुळे वातावरणातील खालच्या पातळीवर आर्द्रतेच्या प्रमाणात वाढ झाल्याची नोंद करण्यात आली होती. हवामान शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, पूर्व पश्चिम ट्रफ मध्य बिहारमधून उत्तर पश्चिम उत्तर प्रदेशातून उप हिमालयीन पश्चिम बंगालकडे जात आहे.
यामुळे राज्यात पुढील 24 तासांत अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पटणा हवामान केंद्राने 'यलो अलर्ट' जारी केला आहे. तसेच लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा इशारा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
पुराच्या पाण्यात पाय भिजतील म्हणून भाजप आमदार कर्मचाऱ्याच्या पाठीवर
Published on: 20 May 2022, 04:39 IST