News

शेतकरी आपल्या शेतीमध्ये घाम गाळून पिके घेत असतात. यामधून चांगले उत्पादन काढण्याचा प्रयत्न करतात. मात्र या कष्टाचीही किमत काही लुटेरे व्यापारी करत नाहीत. व्यापरांनी शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा देत तब्बल 2 कोटी रुपयांना गंडा दिला आहे.

Updated on 29 September, 2022 5:32 PM IST

यवतमाळ: शेतकरी आपल्या शेतीमध्ये (agriculture) घाम गाळून पिके घेत असतात. यामधून चांगले उत्पादन काढण्याचा प्रयत्न करतात. मात्र या कष्टाचीही किंमत काही लुटेरे व्यापारी करत नाहीत. व्यापरांनी शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा देत तब्बल 2 कोटी रुपयांना गंडा दिला आहे.

शेतकरी मागील आठ ते नऊ वर्षांपासून शेतमाल (Agricultural goods) व्यापाऱ्याकडेच विक्री करतात. मात्र वेळेवर पैसे मिळत असल्याने शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला होता. तशा विश्वास देखील या व्यापाराने संपादन केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी २०२०-२१ या हंगामात शेतीमधून निघालेला कापूस, सोयाबीन, तूर, चना हा माल नंदकिशोर ऊर्फ सुनील महल्ले या व्यापाऱ्याला विक्री केला.

मात्र जून २०२१ रोजी व्यापारी रात्री अचानक पसार झाला. शेतकऱ्यांना दिलेले धनादेश वटविण्यासाठी बँकेत टाकले असता, ते वठले नाहीत. ३१ जुलै २०२१ ला शेतकऱ्यांनी दारव्हा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.

फक्त 999 रुपयांमध्ये इलेक्ट्रिक बाइक करा खरेदी; नवीन 'URBN' इ-बाइक लॉन्च

त्यानंतर ३० मार्च २०२२ ला शेतकऱ्यांनी पोलिसांत परत तक्रार दिली. त्यावरही कार्यवाही झाली नाही. फरार व्यापारी सुनील महल्ले याला पोलिसांनी अटक केली नाही. त्याचा शोध घेतला जात नसल्याने शेतकऱ्यांनी २८ जून रोजी पोलिस अधीक्षकांपासून तर मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. मात्र तेव्हाही दुर्लक्ष करण्यात आले.

रब्बी हंगामातील कडधान्यांचे उत्पादन वाढणार; सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

शेवटी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले

माधव राठोड, प्रकाश दहापुते, जहूर महंमद, सुनील तुपटकर, कृपाळू लोधे, अली महंमद नूर महंमद, आरिफ जावेद न्यामुमिया, रवी राठोड, नीलेश ओले, रामराव भालेराव, किरण भालेराव, आशिष ओले, ताजुद्दीन देशमुख, दिगांबर मोहोड, संजय गावंडे, अनिल ढवळे यांच्यासह ४१ शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मात्र प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्याने याप्रकरणी कारवाईसाठी शेतकऱ्यांनी (farmers) १० ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषणाचा (Hunger Strike) इशारा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या 
मोबाइल चोरीला गेल्यावर सहज करता येणार ब्लॉक; सरकार लवकरच घेणार निर्णय
शेतकऱ्यांनो बाधित जनावरांवर त्वरित उपचार करून घ्या; अमरावती जिल्ह्यासाठी 2 लाख 60 हजार लसी उपलब्ध
पोस्ट ऑफिसच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतून वृद्धांना मिळणार लाखों रुपये; घ्या आजच लाभ

English Summary: Shocking Farmers were forced traders tune Rs 2 crore
Published on: 29 September 2022, 05:32 IST