औरंगाबाद जिल्ह्यातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आधीच अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवर आहे यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान अटळ आहे. ऊस अधिक कालावधीपासून फडातच उभा असल्याने उसाच्या वजनात मोठी घट घडून येणार आहे यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हजारोंचा फटका बसणार आहे.
आता जिल्ह्यातील गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असताना जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी मालकतोड पद्धतीने उस्तोड करण्याचे आव्हान केले आहे. याचाच अर्थ आता ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांना ऊसतोड मजुरांना पैसे द्यावे लागणार आहेत. त्यामुळे ऊसतोड मजुरांना मोठे सुगीचे दिवस आले असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आता ऊस तोडणी साठी 14 हजार रुपये आणि वाहतुकीसाठी 4 ते 5 हजार रुपये अतिरिक्त मोजावे लागत आहेत. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी हतबल झाले असल्याचे चित्र जिल्ह्यात बघायला मिळत आहे.
अंबड व घनसावंगी तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणात उसाची लागवड झाली आहे यामुळे तालुक्यातील साखर कारखान्याचे ऊस तोडणीचे नियोजन पुरत कोलमडल आहे. यामुळे सध्या या दोन्ही तालुक्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तालुक्यात अजूनही गाळप अभावी ऊस फडातच वाळून जात आहे. या दोन्ही साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात जवळपास 22 लाख टन होता या पैकी 17 लाख टन उसाचे गाळप झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अजूनही मोठ्या प्रमाणात या दोन्ही तालुक्यात ऊस फडातच असल्याचे सांगितले जात आहे.
एकीकडे राज्यात तापमानात मोठी वाढ होत आहे मराठवाड्यात तापमानाची तीव्रता अधिकच जाणवायला लागली आहे त्यामुळे ऊस तोडणी कामगाराचा ऊस तोडणी करण्यास राजी नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
ऊस तोडणी कामगार जर राजी झाले तर मग ते अवाजवी पैशांची शेतकऱ्यांकडून मागणी करत आहे. आधीच ऊसाचे गाळप वेळेवर होत नसल्याने उसाच्या वजनात घट होत आहे आणि आता तोडणी करण्यासाठी शेतकऱ्यांना अधिक पैसा मोजावा लागत असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
Published on: 10 April 2022, 02:13 IST