News

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला असून 2000 21 ते 22 या आर्थिक वर्षासाठी व्याजदरात कपातकरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Updated on 12 March, 2022 7:04 PM IST

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला असून 2000 21 ते 22 या आर्थिक वर्षासाठी व्याजदरात कपातकरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आता या नवीन निर्णयानुसार धीच्या 8.5 टक्के व्याजाने ऐवजी केवळ 8.1 टक्के व्याज मिळेल.जर या नवीन व्याजदराचा विचार केला तर हा व्याजदरगेल्या चाळीस वर्षातील सर्वात कमी व्याजदर आहे.सन 2019-20 आणि 2020-21  या आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांना 8.50 टक्के व्याज मिळाले.दोन हजार अठरा ते एकोणवीस या आर्थिक वर्षात 8.65 टक्के व्याज मिळाले.जर यामध्ये सर्वाधिक व्याज दराचा विचार केला तर ते 1989 ते2000 या वर्षात मिळाले आहे.पी एफ चीसुरुवात 1952 मध्ये झाली होती. अगोदर 1952 ते 55 पर्यंत तीन टक्के व्याज मिळाले होते.

पीएफवरील व्याजदरात वाढ  दि फायनान्स इन्व्हेस्टमेंट अँड ऑडिट समितीच्या बैठकीत ठरवले जातात. चालू आर्थिक वर्षात जमा होणाऱ्या सगळ्या पैशांचा हिशोब दिला जातो व नंतर सीबीटी ची बैठक होते  व या बैठकीत अर्थमंत्रालयाच्या सहमती नंतर व्याजदर लागू केले जातात. या दराचा निर्णय या आर्थिक वर्षाच्या अखेरीस घेतला जातो. 1952 या वर्षानंतर पीएफ वर दिल्या जाणाऱ्या व्याजदरांमध्ये सातत्याने वाढ झाली. 

1972 या वर्षानंतर पहिल्यांदा 6 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज देण्यात आले तर 1984 मध्ये पहिल्यांदाच दहा टक्क्यांपेक्षा जास्त व्याज देण्यात आले. त्यानंतर व्याज दरात कपात करण्यात येऊन 1999 नंतर आतापर्यंत दहा टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचलेले नाही.गेल्या सात वर्षाचा विचार केला तर व्याजदर 8.50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी देण्यात आला आहे.

English Summary: shock to epfo staff epfo orgnization decrease intrest rate to 8.1
Published on: 12 March 2022, 07:04 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)