काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजप नेते राम शिंदे यांची याठिकाणी आमदार म्हणून वर्णी लागली होती. त्यानंतर आता ते आपल्या कर्जत जामखेड मतदार संघात पुन्हा चांगलेच सक्रिय झाले आहेत. आता त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे सध्याचे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का दिला आहे.
सध्या रोहीत पवार आमदार असलेल्या कर्जत-जामखेडमध्ये भाजपने विजयी घोडदौड सुरू केली आहे. कर्जतमधील तिन्ही ग्रामपंचायती राम शिंदे यांच्या ताब्यात आल्या आहेत. विधान परिषदेवर निवडून येताच राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड पंचायत समितीत परिवर्तन घडवत करून दाखवले आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू आहे.
कर्जत जामखेड पंचायत समितीचा निकाल हा रोहित पवार यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. येणाऱ्या निवडणुकीत यामुळे गणित बदलण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात देखील सत्ता बदल झाला आहे. भाजपचे कोरेगावमध्ये 13 पैकी 7, बजरंगवाडीत 7 पैकी 5 आणि कुळधरणमध्ये13 पैकी 7 सदस्य विजयी झाले आहेत.
दरम्यान, 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा मोठा पराभव केला होता. संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालाकडे लागले होते. त्यानंतरही रोहित पवार यांनी राम शिंदे यांना धक्कातंत्र देण्याची एकही संधी सोडली नव्हती.
महत्वाच्या बातम्या;
कांदाप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, शेतकरी आत्महत्येच्या दारात उभा, पण..
शेतकऱ्यांना कृषी यंत्रांवर 50 ते 80 टक्के अनुदान मिळणार, जाणून घ्या..
शेतकऱ्यांनो आता शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरणासाठी मिळणार एक लाख रुपये, असा घ्या लाभ...
Published on: 05 August 2022, 01:20 IST