डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ निर्मित शेती विषयक तंत्रज्ञान तथा पीक वाणांचे शेतकरी बांधवांना प्रत्यक्ष अवलोकन करता यावे तसेच अत्याधुनिक शेती तंत्र आत्मसात करीत फायद्याचे शेतीचे अनेक अनेक पैलू प्रत्यक्ष बघता यावे शास्त्रज्ञान सोबत चर्चेद्वारे शेतीविषयक शंका समाधान करता यावे या हेतूने विद्यापीठाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत दरवर्षी तीन दिवसीय शिवाय फेरीचे आयोजन विद्यापीठाच्या विस्तार शिक्षणासंचालनायद्वारे करण्यात येते.
यंदा शिवार फेरीचे आयोजन मंगळवार दिनांक 18 ऑक्टोबर ते गुरुवार दिनांक 20 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे.Thursday 20th October has been done.या तीन दिवसीय शिवार फेरीचे उद्घाटन मंगळवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता शेतकरी सदन येथे संपन्न होणार
कृषि महाविद्यालय अकोला येथे आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवाचे आयोजन
असून शेतकरी बांधवांची नोंदणी नंतर विद्यापीठाचे वाहनाद्वारे विविध प्रक्षेत्र व संशोधन विभागाना प्रत्यक्ष भेटी देण्याची संधी शेतकरी बांधवांना उपलब्ध झाली आहे. उपरोक्त तीनही दिवशी सकाळी 9 वाजेपासून नोंदणी शेतकरी सदन येथे करता येणार आहे.
यंदाचे शिवार फेरीत सहभागी शेतकरी बंधू भगिनींना उद्यान विद्या विभागाद्वारे प्रांगण विद्या व फुलशास्त्र विभागाचे प्रक्षेत्रावर व्यावसायिक फुलांच्या जाती प्रत्यक्ष बघता येणार असून फळशास्त्र विभागात नानाविध फळ झाडांचे प्रकारांचे अवलोकन करण्यासह त्यांची रोपे व कलमा यांची नोंदणी करता येईल. तर भाजीपाला शास्त्र विभागाद्वारे भाजीपाला पिकांची संरक्षक लागवड पद्धती व आधुनिक पद्धतीचा शास्त्रीय अवलंब करण्याचे साधे सोपे पर्याय बघता येतील. काळाची गरज असलेल्या सेंद्रिय शेती
विषयी अधिक जाणून घेण्यासाठी सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण प्रकल्पावरील विविध शास्त्रीय प्रयोग तथा कीड व रोग नियंत्रणाच्या साध्या सोप्या पद्धती, जैविक निविष्ठा तयार करण्याच्या पद्धती, दशपर्णी अर्क निंबोळी अर्क तयार करणे व वापरण्याच्या पद्धती, यासह गांडूळ खत फॉस्फो कंपोस्ट, जीवामृत वर्मी वाश इत्यादी तयार करण्याच्या व वापरण्याच्या पद्धती विषय सविस्तर होणार आहे.शेतीचे यांत्रिकीकरण काळाची गरज असून शेतमाल प्रक्रिया गाव पातळीवरच होण्यासाठी कापणी पश्चात
प्रक्रिया तंत्रज्ञान विभागात कांदा बीज निष्काषन यंत्र, सीताफळ गर काढणी यंत्र, सुधारित कांदा चाळ, मिरची बीज निष्काषन यंत्र, ओवासोप बीज निष्काषन यंत्र, फळ प्रातवारी यंत्र, कांदा लोडिंग अनलोडींग यंत्र, मिनी दाल मिल, सफाई प्रतवारी यंत्र, हळद काप यंत्र, हळद सफाई यंत्र, हिरवे दाणे सोडणे यंत्र, हरभरा गाठी काढणी यंत्र यासह गाव पातळीवर कृषी माल प्रक्रिया स्थापन करणे संदर्भात सविस्तर मार्गदर्शन मिळणार आहे. विदर्भाचे मुख्य पीक असलेल्या कापूस पिकाविषयी विद्यापीठाच्या
कापूस संशोधन विभागात विद्यापीठ संशोधित बीटी कापूस वाण, देशी सरळ वाण व हायब्रीड कापूस प्रात्यक्षिके, सघन कापूस लागवड पद्धत, किडी व रोगांचा अल्प खर्चात केलेला प्रतिबंध याची देही याची डोळी पहावयास उपलब्ध करण्यात आलेला आहे. संत्रा,मोसंबी,लिंबू आदि लिंबूवर्गीय पिकांचे जिवंत प्रात्यक्षिके व विविध वाणांचा, संग्रह रोपे व कलमांची सविस्तर माहिती लिंबूवर्गीय संशोधन प्रकल्पावर उपलब्ध असणार आहे. तसेच संत्रा पिकाचे विविध वाण एकाच ठिकाणी बघण्याची संधी सुद्धा या निमित्ताने उपलब्ध झाली आहे. तर कडधान्य व तेल
वर्गी पिकांचे विविध जाती मिरची व भाजीपाला सह ओवासोप लागवड तंत्रज्ञान कोरडवाहू पीक लागवड पद्धतीचे तंत्रज्ञान यावर्षीच्या शिवार फेरीचे वैशिष्ट्ये सांगता येतील.या शिवार फेरीचे निमित्ताने शेतकरी बंधू भगिनींना आपल्या शेतीविषयक समस्यांचे तज्ञांकडून वेळीच करण्याची ही सुवर्णसंधीच आहे. विदर्भासह राज्यातील सर्वच विभागातील शेतकरी बंधू भगिनींनी या शिवार फेरीचा लाभ घ्यावा व येणारा हंगाम यशस्वी करावा असे आवाहन विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी केले आहे.
Published on: 13 October 2022, 01:33 IST