दिल्ली : शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आले असून आता हे चिन्ह दोन्ही गटांला वापरता येणार नाही आहे. या सोबतच शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही.
दोन्ही गटाला नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आयोगाला पर्याय द्यायचे आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण दिल्ली येथे सुरू असलेली निवडणूक आयोगाची बैठक संपली आहे.
या बैठीकत सर्वात महत्वाचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आले असून आता हे चिन्ह दोन्ही गटांला वापरता येणार नाही आहे. या सोबतच शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही.
दुर्दैवी! विद्युत तारेचा करंट तळ्यात उतरला; एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा मृत्यू
दोन्ही गटाला नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आयोगाला पर्याय द्यायचे आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचे दोन गट पडले. या दोन्ही गटाचा शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हासाठी लढा सुरू होता. हा मुद्दा सुप्रीम कोर्टात गेला होता. मात्र, सुप्रीम कोर्टाने हा विषय निवडणूक विभागाकडे पाठवला.
ऐकावे ते नवलंच! चक्क विहीर चोरीला गेली! काय आहे अजब गजब प्रकार जाणून घ्या..
या संदर्भात आज दिल्लीत निवडणूक आयोगाची बैठक सुरू होती. त्यामुळे शिवसेनेच्या धनुष्यबाण नेमका कुठल्या गटाला मिळेल या बाबत निर्णय होण्याची शक्यता होती. दरम्यान निवडणूक आयोगाने आपला निकाल जाहीर केला आहे.
हे चिन्ह दोन्ही गटाला आता वापरता येणार नाही. निवडणूक आयोगाची दिल्ली येथील या संदर्भातील बैठक संपली आहे. उद्धव गटाने या संदर्भात घाईने निर्णय देऊ नये असे सांगितले होते. मात्र, निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला धक्का दिला आहे.
मोठी बातमी! धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास शिवसेना 'या' चिन्हाची मागणी करणार
Published on: 09 October 2022, 09:34 IST