अवकाळी पावसाचा फटका बसल्याने अनेक शेतकरी अनेक संकटांना सामना करत आहेत जे की काही शेतकऱ्यांचे पीक पाण्यात आहे तर काही लोकांच्या पिकाला बुरशी लागलेली आहे. डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि अवकाळी पावसाने संकटात असलेल्या शेतकऱ्याने अगदी योग्य प्रकारे शेतीचे नियोजन करून डाळिंबाच्या बागेची लागवड केली आणि त्यामधून चांगल्या प्रकारे उत्पन्न सुद्धा भेटवले.
शेतकऱ्याला जवळपास ३५ लाख रुपयांचा नफा :
डाळिंबाच्या फळबागेचे योग्य प्रकारे नियोजन करून त्यांनी पाण्याची तसेच अनेक जी पोषक तत्वे त्याची चांगल्या प्रकारे सोय करून डाळिंब फळाची चांगल्या प्रकारे जोपासना केली. प्रति एकर त्यांना दीड लाख रुपये खर्च आला जे की त्यांचे डाळिंब फक्त आपल्या देशातच न्हवे तर विदेशात सुद्धा गेले. बांगलादेश तसेच रशिया या परदेशी देशात डाळिंब विकले गेले. चार एकर डाळिंबातून या शेतकऱ्याला जवळपास ३५लाख रुपयांचा नफा झालेला आहे.निफाड मधील शिरवाडे वणी या गावात रामराव डेरेनी या नावाचे शेतकरी राहतात. आंतराष्ट्रीय बाजारात आपली चांगल्या प्रकारे कमाई आणि वेगळ्याच प्रकारची कमाल दाखवून तेथील परिसरातील शेतकऱ्यांमध्ये एक प्रेरणदायी उदाहरण तयार केले आहे.
शिरवाडे वणी या गावातील(village)तसेच त्यांच्या आसपासच्या परिसरातील शेतकरी सुद्धा त्यांच्या डाळिंब बागेला भेट द्यायला येत आहेत तसेच त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे प्रशिक्षण, सल्ला घेत आहेत.रामराव डेरे या आदर्श शेतकऱ्याला दोन मुले देखील आहेत, या दोन मुलांचे चांगले शिक्षण सुद्धा होऊन दोघांनी डिग्री प्राप्त केलेली आहे. मात्र दोघांनी असे ठरवले की नोकरीचा नोकरीच्या शोधात राहण्यापेक्षा आपली जी वडिलोपार्जित शेती राखलेली आहे तीच शेती करू म्हणजे वडिलांना सुद्धा शेतीला(farming) हातभार लागेल. त्या दोन मुलांनी द्राक्षाच्या बागेसोबत च डाळिंबाच्या बागेची लागवड केली.डेरे कुटुंबाने डाळिंब तज्ञ संजय गुंजाळ यांचा सल्ल्या घेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली दीड लाख रुपये खर्च करत चार एकर शेतीत डाळिंबाची बाग धरली. डाळिंब फळाला चांगल्या प्रकारे वाढण्यासाठी निम्या मध्ये जैविक खते तर निम्या मध्ये रासायनिक खतांचा वापर केला.
अगदी योग्य प्रकारे चांगले नियोजन करून ड्रीप पद्धतीने डाळिंबाच्या रोपांना पाणी पुरवठा केला आणि थोडा अभ्यास करून वेळेला फवारण्या सुद्धा केल्या आणि रोगांचा प्रादुर्भाव टाळला त्यामुळे डाळिंब बागेची योग्य प्रकारे वाढ सुदधा झाली आणि दर्जदार प्रकारचे डाळिंबाचे फळ देखील आले.जे दर्जदार डाळिंब अगदी लाल भडक रंगाच्या आणि गोड चव असणारे फळ फक्त देशातच न्हवे तर बांग्लादेश तसेच रशिया या परदेशात सुद्धा विकले गेले. आंतराष्ट्रीय बाजारात चांगल्या प्रकारे डेरे कुटुंबियांच्या डाळिंबाला भाव सुद्धा मिळाला आणि चार एकरात त्यांना ३५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.
Published on: 12 September 2021, 05:19 IST