News

गेल्या 25 वर्षात पहिल्यांदाच शेतकऱ्यांबद्दल सरकारची एव्हढी असंवेदनशीलता आणि बेजबाबदारपणा मी पाहत आहे. सवंग लोकप्रियतेसाठी नुसत्या घोषणा सुरु आहेत. शिंदे-फडणवीस सरकारला लाज वाटली पाहीजे अशी घणाघाती टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.

Updated on 02 November, 2022 10:26 AM IST

गेल्या 25 वर्षात पहिल्यांदाच शेतकऱ्यांबद्दल सरकारची एव्हढी असंवेदनशीलता आणि बेजबाबदारपणा मी पाहत आहे. सवंग लोकप्रियतेसाठी नुसत्या घोषणा सुरु आहेत. शिंदे-फडणवीस सरकारला लाज वाटली पाहीजे अशी घणाघाती टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.

राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक दोघांचंही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष नाही. सत्ताधारी भांडणातच मशगुल आहेत. त्यामुळं आता शेचकऱ्यांनीचं ठरवाव, चोरांच्या मागे जावं की नाही अशी टीका राजू शेट्टींनी केली.

या वर्षी कारखान्यांनी यंदाची एफआरपी एकरकमी द्यावी, हंगाम संपल्यानंतर ३५० रुपये द्यावेत, आणि गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला एफआरपी (FRP) पेक्षा दोनशे रुपये जास्त मिळावेत अशा विविध मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केल्या आहेत.

17 आणि 18 नोव्हेंबरला ऊस वाहतूक बंद पाडण्याचा राजू शेट्टींचा इशारा; कारण...

मागण्या मान्य होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही शेट्टी यांनी दिला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील टाकळीमियाँ येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद संपन्न झाली. यावेळी शेट्टी बोलत होते. दरम्यान, सरकारने गांभीर्याने लक्ष न दिल्यास 17 आणि 18 नोव्हेंबर रोजी राज्यातील ऊस वाहतूक बंद करण्यात येईल, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.

ऊस दराच्या मागणीसह साखर कारखाने काट्यामध्ये शेतकऱ्यांचा ऊस लुट करत आहेत, असा आरोप राजू शेट्टी यांनी कारखानदारांवर केला आहे. राज्यातील साखर कारखान्याचे काटे ऑनलाईन केले जावेत. त्याचबरोबर सर्व साखर कारखान्याच्या काट्यांवर साखर आयुक्तांचे नियंत्रण असावे आणि यासंदर्भात अंमलबजावणी करावी.

7th pay commission: कर्मचाऱ्यांचा मूळ वेतनात होणार मोठी वाढ

या मागणीसाठी येत्या सात नोव्हेंबरला पुण्यात साखर आयुक्तालयावर भव्य मोर्चा काढणार असल्याचा इशारा देखील शेट्टींनी यावेळी दिला आहे. सरकारनं गांभिर्याने लक्ष दिले नाही तर 17 आणि 18 नोव्हेंबरला राज्यातील ऊस वाहतूक बंद पाडणार असल्याचा इशारा शेट्टी यांनी दिलाय.

मुकादमांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लुट होत असल्यानं मुकादम व्यवस्था संपवावी. बांधकाम मजुरांप्रमाणं महामंडळानं ऊस तोडणी मजूर पुरवावेत. मुकादम कारखाना आणि शेतकऱ्यांची देखील फसवणूक करतात असे राजू शेट्टी यावेळी म्हणाले.

महागाईतून दिलासा; LPG सिलेंडर इतक्या रुपयांनी स्वस्त, हे आहेत नवे दर

English Summary: Shinde-Fadnavis government should be ashamed, Raju Shetty's harsh criticism
Published on: 02 November 2022, 10:26 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)