News

परतीच्या पावसानं यंदा शेतकऱ्यांचं अमाप नुकसान केलं आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी यासाठी विरोधी पक्ष नेते, शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांकडून सरकारकडे वारंवार मागणी केली जात आहे.

Updated on 01 November, 2022 5:20 PM IST

परतीच्या पावसानं यंदा शेतकऱ्यांचं अमाप नुकसान केलं आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी यासाठी विरोधी पक्ष नेते, शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांकडून सरकारकडे वारंवार मागणी केली जात आहे. नुकतेच बीडचे पालकमंत्री अतुल सावे (atul save) यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली होती. या बैठकीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना (farmers) मदत करण्याच्या मुद्यावरुन काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

शिंदे -फडणवीस सरकार हे शेतकऱ्यांची जबाबदारी घ्यायला तयार नाहीत, तसेच हे सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करत असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली होती.

या बैठकीला काँग्रेसच्या खासदार रजनी पाटीलदेखील उपस्थित होत्या. या बैठकीदरम्यान त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही कोणतीच मदत मिळाली नसल्याचा सवाल उपस्थित केला मात्र यावर बीडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी अनपेक्षित उत्तर दिल्याचं रजनी पाटील म्हणाल्या.

माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी या बैठकीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे . मात्र आता राज्य सरकारने पिक विमा न देणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करायला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे न दिल्याने राज्यात अनेक भागातील शेतकऱ्यांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे परतीच्या पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झाल्याने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जोर धरत आहे.

7th pay commission: कर्मचाऱ्यांचा मूळ वेतनात होणार मोठी वाढ

दरम्यान पालकमंत्री अतुल सावे यांनी बैठकीमध्ये विविध विकासकामांचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचना सर्व विभागांना देण्यात आल्याचे सांगितले. तसेच सर्व विकासकामे लवकर पूर्ण करून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याचा आपला प्रयत्न असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं.

महत्वाच्या बातम्या:
पुष्कर मेळा 2022: जगप्रसिद्ध पुष्कर मेळा सुरू, विविध देशांतील पर्यटक आमंत्रित
केंद्र सरकारची भन्नाट योजना, शेतकऱ्यांचाही होणार फायदा, इंधनाच्या दराबाबत महत्वाची योजना!

English Summary: 'Shinde-Fadnavis government is rubbing salt in farmers' wounds'
Published on: 01 November 2022, 05:18 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)