News

Shinde-Fadnavis: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन महिना पूर्ण झाला आहे. पण तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.

Updated on 03 August, 2022 5:26 PM IST

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन महिना पूर्ण झाला आहे. पण तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.

या महिनाभरात पत्रकार परिषदेत शिंदे यांना सर्वाधिक प्रश्न विचारला गेला की मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? तसेच शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळेबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

येत्या रविवारपर्यंत म्हणजेच ७ ऑगस्टपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. एकीकडे न्यायालयात सुनावणी सुरू असून त्यावर उद्या, गुरुवारी सुनावणी होणार आहे.

त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार आणखी पुढे ढकलला जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र आता केसरकर यांच्या वक्तव्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

तुम्ही नेमके आहात कोण? कोर्टाचा शिंदे गटाला थेट सवाल, निर्णय विरोधात जाण्याची शक्यता

राज्यपाल 5 ऑगस्टला मुंबईत आहेत. आणि त्याच दिवशी शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे. कारण राज्यपाल कोश्यारी 6 ऑगस्टला पुन्हा दिल्लीला जाणार आहेत. राज्यपाल 6 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दिल्लीत आझादी का अमृतमहोत्सव समितीच्या बैठकीत उपस्थित राहणार आहेत.

भाजपकडून कुणाला संधी मिळू शकते?

1. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)
2. गिरीश महाजन (Girish Mahajan)
3. प्रवीण दरेकर (Pravin Darekar)
4. राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)
5. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)
6. आशिष शेलार (Ashish Shelar)
7. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)

मोठी बातमी: गावात बालविवाह झाला तर सरपंच, सदस्य आणि ग्रामसेवक होणार निलबिंत

शिंदे गटाकडून

1. दादा भुसे (Dada Bhuse)
2. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)
3. शंभूराज देसाई (Shambhuraj Desai)
4. अब्दुल सत्तार (Abdul Sattar)
5. उदय सामंत (Uday Samant) यांना संधी मिळू शकते.

PM Kisan: शेतकऱ्यांचे अच्छे दिन! 12व्या हप्त्यात 2000 ऐवजी मिळणार 4000 रुपये; जाणून घ्या कसे

English Summary: Shinde-Fadnavis government cabinet expansion date decided
Published on: 03 August 2022, 05:26 IST