Jalna News :
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी येथे सुरु असलेल्या आंदोलनाला शेतकरी कामगार पक्षाने आपला पाठिंबा दिला आहे. शेकापचे नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी अंतरवली सराटी येथे उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.
यावेळी बोलताना डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले की, आंदोलकांवर काही दिवसांपूर्वी लाठीचार्जची घडलेली घटना अतिशय दुर्दैवी, निंदनीय आहे. मराठा आरक्षण हा समाजाच्या अस्मितेचा मुद्दा असून त्याकरिता कितीही मोठा लढा द्यावा लागला तर आपण तो देऊ. ते पुढे म्हणाले की, माझी मराठा आंदोलकांना विनंती आहे की, त्यांनी कुठल्याही नेत्याच्या स्वार्थी राजकारणाला बळी पडू नये. त्यांनी वस्तुस्थिती जाणून घ्यावी व कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये.
मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आकरावा दहावा दिवस आहे. मागील दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली आहे. तरी मात्र जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहेत. प्रकृती खालावली असल्याने त्यांना काल सलाईन देखील लावण्यात आली. तसंच त्यांच्या अंगात ताकद राहिली नसल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले आहे.
दरम्यान, दरम्यान २९ ऑगस्टपासून पैठण फाटा येथे मनोज जरांगेनी आंदोलनाची हाक दिली आहे. तेव्हापासून जरांगे उपोषणावर ठाम आहे. तसंच आता त्यांची प्रकृती खालावत असल्यामुळे आंदोलकांना देखील त्यांची काळजी वाटू लागली आहे. जर त्यांना त्रास झाला तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील, असं आंदोलकांनाकडून सांगण्यात येत आहे.
Published on: 08 September 2023, 05:08 IST