Nashik News : नाशिकमध्ये ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन आणि मीडिया एक्झिबिटर्स प्रा.लि यांच्या संयुक्त विद्यमाने 'कृषीथॉन'या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात (दि.२५) रोजी 'प्रयोगशील युवा कृषी उद्योजक' म्हणून शरयू शांताराम लांडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला आहे.
या प्रदर्शनात यावेळी विविध महिलांचा सन्मान करण्यात आला. तसंच उपस्थितांसाठी विविध पिकांबाबत माहिती देण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. तसंच विविध विषयांबाबत देखील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रदर्शनात काय आहे?
नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कृषीथॉन प्रदर्शनात विविध शेती कंपनीचे स्टॉल सहभागी आहेत. यात आधुनिक यांत्रिकीकरण मशिनरी साहित्य, ऑरगॅनिक शेती साहित्य, शेततळे साहित्य, किटकनाशके, खाद्य पदार्थ, विविध कंपनीचे ट्रॅक्टर, मधमाशी पालन, मत्स्यपालन असे विविध स्टॉल सहभागी झाले आहेत. तसंच प्रदर्शन पाहण्यासाठी नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकरी हजेरी लावत आहेत.
Published on: 26 November 2023, 08:23 IST