अहमदनगर
राज्य सरकारचा 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम आज अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे पार पडणार आहे. यामुळे शिर्डी विमानतळ परिसरात राष्ट्रवादी, भाजपकडून बँनरबाजी करण्यात आली आहे. यातील कोपरगावचे आमदार आशितोश काळे यांनी लावलेला बँनर चर्चेचा विषय बनला आहे. या बँनरवर शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो जवळ जवळ लावण्यात आला आहे. त्यामुळे या भाागात चर्चा रंगू लागली आहे.
एकीकडे शरद पवार यांनी अजित पवार गटाला त्यांचे फोटो न वापरण्याचा इशारा दिला आहे. नाहीतर याबाबत मी न्यायालयात जाईल, असा इशारा शरद पवारांनी दिला आहे. तरी देखील अजित पवारांच्या बँनरवर शरद पवार यांचा फोटो लावण्यात आला आहे. तसंच शरद पवारांच्या फोटो जवळ देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यात लावण्यात आला आहे.
नगर जिल्ह्यातील शिर्डी येथे 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाचे आज सरकार आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शहरात विविध पक्षाच्या वतीने बँनरबाजी करण्यात आली आहे. यातील सर्वांत लक्षवेधी बँनर ठरला आहे तो आमदार आशितोष काळे यांनी लावलेला.
शरद पवारांनी फोटो न वापरण्याचा इशारा दिला आहे तरी देखील फोटो वापरण्यात आला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या बँनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देखील फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे या बँनरची चर्चा चांगली रंगली आहे.
शरद पवार काय भूमिका घेणार याकडे लक्ष?
शरद पवार यांनी फोटो न वापरण्याचा इशारा दिला आहे. तरी देखील फोटो वापरण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शरद पवार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: 17 August 2023, 12:51 IST