महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी भाजप खासदार रामदास तडस यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील परिषद भारतीय कुस्ती महासंघाने काही दिवसांपूर्वी बरखास्त केली होती. यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर आता भाजपचे वर्चस्व निर्माण होणार आहे.
राज्यात सत्तांतर झाले आणि अनेक घडामोडी घडल्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अध्यक्ष असलेली कुस्तीगीर संघटना बरखास्त करण्यात आली. यामुळे राष्ट्रवादीसाठी हा एक मोठा धक्का मानला जात होता. ही संघटना ताब्यात घेण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली होती. याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
असे असताना आता राष्ट्रवादीला अजून एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आता राष्ट्रवादीच्या हातून दुसऱ्या संघटनेचे अध्यक्षपद जाण्याच्या मार्गावर आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार हे महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आहेत. मात्र आता त्यांना हे अध्यक्षपद सोडावे लागणार आहे. दिल्ली हायकोर्टाच्यावतीने नियुक्त करण्यात आलेल्या भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे अंतरिम अध्यक्ष अनिल खन्ना यांनी ११ जुलै रोजी यासंदर्भात परिपत्रक जारी केले.
शेतकऱ्यांना कृषी यंत्रांवर 50 ते 80 टक्के अनुदान मिळणार, जाणून घ्या..
यामध्ये मार्गदर्शक तत्त्वांनुसार आता महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेला आपल्या घटनेत बदल करावा लागणार आहे. यामुळे नियमानुसार अजित पवारांना ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. यामुळे आता राष्ट्रवादीला हा एक मोठा धक्का बसणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
मँगो मॅन हाजी कलीमुल्ला यांचे सुष्मिता सेन, अमित शहा यांच्या नावावर नवीन वाणांची निर्मिती...
रोहित पवारांना मोठा धक्का! विधान परिषदेवर जाताच राम शिंदेंनी करून दाखवलं..
कांदाप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, शेतकरी आत्महत्येच्या दारात उभा, पण..
Published on: 05 August 2022, 02:45 IST