News

येवला, बीड नंतर जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची स्वाभिमानी सभा होत आहे. शहरातील सागर पार्क मैदानावर दुपारी तीन वाजता ही जाहीर सभा होणार आहे.

Updated on 05 September, 2023 11:47 AM IST

Jalgaon News :

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं जळगावमध्ये कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं आहे. कार्यकर्त्यांनी क्रेन, जेसीबीवरुन शरद पवारांवर पुष्पवृष्टी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर आज (दि.५) रोजी शरद पवारांची जळगावमध्ये सभा होत आहे. यापूर्वी नाशिक, बीड या ठिकाणी शरद पवारांनी सभा घेतली आहे.

येवला, बीड नंतर जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची स्वाभिमानी सभा होत आहे. शहरातील सागर पार्क मैदानावर दुपारी तीन वाजता ही जाहीर सभा होणार आहे.

शरद पवारांचे शहरात आगमन झाल्यानंतर अजिंठा चौकात शरद पवार यांचे जंगी स्वागत करण्यात आले. जीसीबींवरुन शरद पवारांच्या ताफ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी एक मोठ्या क्रेनवर भव्य हार देखील होता.

राष्ट्रवादी काँग्रेस फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी स्वाभिमानी सभा घेण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे शरद पवार नेमके आजच्या सभेत काय बोलणार? कुणाला लक्ष करणार?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देखील राज्यातील आतापर्यंतच्या सर्व सभांपेक्षा जळगावची सभा सर्वात मोठी ठरावी, यासाठी नियोजन केले जात आहे.

जळगावमध्ये कार्यकर्त्यांकडून जोरदार बँनरबाजी करण्यात आली आहे. काही बँनरवर वाघ कधीच म्हातारा होत नाही, असा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे आज होणाऱ्या सभेकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

मराठा आरक्षणबाबत बोलण्याची शक्यता

जालन्यात घडलेल्या घडनेबाबत शरद पवार भाष्य करण्याची शक्यता आहे. तसंच मराठा आरक्षणाबाबत बोलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जालन्यात झालेल्या लाठीचार्जबाबत शरद पवार सरकारमधील नेत्यांना लक्ष्य करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

English Summary: Sharad Pawar's meeting in Jalgaon NCP Update
Published on: 05 September 2023, 11:47 IST