News

मुंबई: शिवसेनेत गेल्या काही दिवसांपूर्वी २ गट निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील काही आमदारांना सोबत घेत भाजपबरोबर सरकार स्थापन केले आहे. तेव्हापासून शिवसेना आणि शिंदे गटामध्ये कशा ना कशावरून तरी वादाची ठिणगी पडत आहे. आता निमित्त आहे ते शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणी घेईचा?

Updated on 03 September, 2022 3:39 PM IST

मुंबई: शिवसेनेत (Shivsena) गेल्या काही दिवसांपूर्वी २ गट निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतील काही आमदारांना सोबत घेत भाजपबरोबर (BJP) सरकार स्थापन केले आहे. तेव्हापासून शिवसेना आणि शिंदे गटामध्ये कशा ना कशावरून तरी वादाची ठिणगी पडत आहे. आता निमित्त आहे ते शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा (Dussehra Rally) कोणी घेईचा?

शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटामध्ये टीका सत्र सुरु आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार असल्याचे सांगितले आहे तर एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दसरा मेळावा घेण्यासाठी आग्रही आहेत. अजूनतरी कोणालाही परवानगी मिळाल्याची दिसत नाही.

आता शिंदे आणि ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याच्या वादामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उडी घेतल्याचे दिसत आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे पवार शिवसेनेच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्याचे दिसत आहेत.

LIC Scheme: छोट्या गुंतवणुकीत 22 लाखांपर्यंत परतावा, LIC ची नवी योजना; जाणून घ्या सविस्तर...

शरद पवार म्हणाले, मेळावा घेण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. पण वाद टाळले गेले पाहिजेत. मुख्यमंत्री राज्याचे असतात. ते एका पक्षाचे नसतात. त्यामुळे त्यांनी सर्वसमावेशक भूमिका घ्यावी. सामोपचाराने त्यांनी वाद सोडवला पाहिजे असा सल्ला पवारांनी दिला आहे.

Electric Car: महिंद्राची जबरदस्त इलेक्ट्रिक एसयूव्ही कार या महिन्यात होणार लॉन्च; सिंगल चार्जमध्ये 400 किमी धावणार

बिहारच्या सत्ता बदलानंतर पहिल्यांदाच नितीश कुमार हे दिल्लीमध्ये शरद पवार यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे देशाच्या सध्याच्या राजकारणावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोदी सरकारला टक्कर देण्यासाठी दुसरा पर्याय शोधण्यावर भर देण्याची चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या:
गॅसच्या किमती 5 वर्षात किती वाढल्या? आकडा ऐकून तुम्ही व्हाल हैराण...
आमच्या कमळाला बाई म्हणता, तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला पेंग्विनसेना म्हणायचं का?

English Summary: Sharad Pawar's jump Thackeray-Shinde group's Dussehra gathering ground controversy
Published on: 03 September 2022, 03:39 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)