राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांची निवड करण्यात आली आहे. कारखानदारीतील मोठा अनुभव त्यांना आहे.
राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे पहिल्या संचालक मंडळापासून ते आजअखेर ५४ वर्षे ते संचालक, तर गेल्या ३० वर्षांपासून अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. दोन वर्षांपूर्वी पी. आर. पाटील यांचा कुरळप जन्मगावी वाढदिवसानिमित्त शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
त्यावेळी पवार यांनी पाटील यांच्या साखर कारखानदारीतील अनुभवाचा फायदा राज्याला देण्यासाठी राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदी निवड करीत असल्याचे जाहीर केले होते. यामुळे आता हा निर्णय घेण्यात आला आहे.
आम आदमीने दिल्ली महापालिकेचे तख्त जिंकले, भाजपची 15 वर्षांची सत्ता उलथवली
मुंबईत झालेल्या संचालक मंडळाच्या विशेष बैठकीत ही निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्याकडून पाटील यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचा सत्कार केला.
दरम्यान, साखर उद्योगातील जाणकार व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य आणि जिल्हा बँकेचे संचालक म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. त्यांनी अनेक कामे मार्गी लावली आहेत.
कांद्याचा वांदा! शेतकऱ्याने रेखाटली कांद्यावर नरेंद्र मोदींची मुद्रा, शेतकरी अडचणीत
सहवीज निर्मिती प्रकल्प उभारणी, अर्कशाळा प्रकल्पाचा विस्तार आणि आधुनिकीकरण अशा सर्व कामांमध्ये त्यांचे योगदान आहे. साखर उद्योगातील जाणकार व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
महत्वाच्या बातम्या;
गुजरातमध्ये भाजपच नंबर वन! चंद्रकांत पाटील होणार गुजरातचे मुख्यमंत्री? चर्चांना उधाण
धक्कादायक! वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, शिल्लक ठेवले फक्त धड...
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्याला जो धडा शिकवेल त्याला मोफत गुवाहाटी ट्रिप!!
Published on: 08 December 2022, 04:52 IST