बीड
राष्ट्रवादी पक्षात दुफळी झाल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची बीडमध्ये दुसरी सभा होत आहे. अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या धनंजय मुंडे यांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची सभा आज (दि.१७) पार पडणार आहे. त्यामुळे शरद पवार नेमके कशा प्रकारे मुंडेंवर निशाना साधणार. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शरद पवारांच्या सभेपू्र्वी बीडमध्ये शरद पवारांना भावनिक साद घालणारे बँनर लावण्यात आले आहेत. पण त्यावर कोणेही नाव लिहायचे धाडस केले नाही. तसंच सभेसाठी जवळपास ५० हजार लोकांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे.
सभेपूर्वी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या वतीने शहरात भव्य रॅली काढून पवारांचे स्वागत होणार आहे. साडेबारा वाजता शरद पवार बीड शहरात दाखल होणार आहेत. महालक्ष्मी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी शरद पवारांची जाहीर सभा पार पडणार आहे.
दरम्यान, अजित पवार गटाने देखील शरद पवारांना सभांमधून उत्तर देण्याचे ठरवले आहे. अजित पवारांची यांची देखील १० दिवसांनी म्हणजेच २७ ऑगस्ट रोजी बीडमध्ये सभा पार पडणार आहे. त्यामुळे शरद पवार विरुद्ध अजित पवार गटाचा पहिला सामना बीडमध्ये रंगणार आहे.
Published on: 17 August 2023, 11:53 IST