News

आजकालचे युग हे यांत्रिक आणि तांत्रिक युग आहे असे म्हटले जाते. विज्ञानाच्या जोरावर माणसाने उच्च अशी प्रगती गाठली आहे. तंत्रज्ञानामुळे दिवसभराची कामे क्षणार्धात होतात. कमी वेळात अधिक कामे होतात तसेच शेती उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होते. असे अनेक असे फायदे तंत्रज्ञानाचे आहेत.

Updated on 16 April, 2022 11:33 AM IST

आजकालचे युग हे यांत्रिक आणि तांत्रिक युग आहे असे म्हटले जाते. विज्ञानाच्या जोरावर माणसाने उच्च अशी प्रगती गाठली आहे. तंत्रज्ञानामुळे दिवसभराची कामे क्षणार्धात होतात. कमी वेळात अधिक कामे होतात तसेच शेती उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होते. असे अनेक असे फायदे तंत्रज्ञानाचे आहेत.

मोठा फायदा जनतेला होणार:

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल चे भाव झपाट्याने वाढत आहेत. पेट्रोल हा आजच्या युगाला एक अविभाज्य घटक आहे असे मानले जाते. पेट्रोलचा उपयोग  वाहने,  मशीन  यामध्ये  मोठ्या प्रमाणात केला जातो. सध्या पेट्रोल ला पर्याय म्हणून नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली इथेनॉल ची निर्मिती करण्यासाठी साखर कारखाने पुढे आले आहेत. आता इथेनॉल वर यंत्रे शिवाय वेगवेगळ्या मशिनरी आणि वाहने चालणार असल्याचे समजत आहे. तसेच पेट्रोल च्या तुलनेत इथेनॉल स्वस्त असणार आहे याचा मोठा फायदा जनतेला होणार आहे.

जालना जिल्ह्यातील असणारा कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याने इथेनॉल च्या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. त्यामुळे  हा संपूर्ण  इथेनॉल  प्रकल्प  60 हजार लिटर प्रतिदिन इथेनॉल तयार करेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.आणि या इथेनॉल च्या प्रकल्पाचे उद्घाटन हे माननीय माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वेस्ट इंडियन शुगर मिल्सचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, आमदार रोहित पवार, सतीश चव्हाण, विक्रम काळे या दिगग्ज नेत्यांची आणि अधिकाऱ्यांची सुद्धा हजेरी लागणार आहे.

पोकरा’ अंतर्गत दाढेगाव, शेवगा आणि पांगरखेडा येथील विविध कामांची पाहणी पवार साहेब करणार आहेत शिवाय काही कामांचे लोकापर्पण सुद्धा शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. त्याचवेळी ते शेतकरी बांधवांबरोबर संवाद साधून त्यांच्या वेगवेगळ्या समस्या जाणून घेणार आहेत. हा संपूर्ण कार्यक्रम हा 10 ते 11.30 या वेळेत पार पडणार आहे.या कार्यक्रमात राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले, ‘पोकरा’चे प्रकल्प संचालक राहुल द्विवेदी विभागीय कृषी सहसंचालक डॉ. डी. एल. जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भी. शं. रणदिवे, ‘पोकरा’चे कृषी विद्यावेत्ता विजय कोळेकर यांची सुद्धा उपस्थित राहणार आहे.

इथेनॉल वापराचे फायदे:-

1)इथेनॉल चा वापर वाहनांना केल्यामुळे प्रदूषण कमी प्रमाणात होते शिवाय पेट्रोल ला पर्यायी मार्ग म्हणून इथेनॉल ला नवीन ओळख मिळणार.
2)इस्टर तयार करण्यासाठी इथेनॉल चा वापर केला जातो. तसेच परफ्यूम निर्मितीसाठी इथेनॉल आवश्यक असते.
3)इथेनॉलचा वापर हा प्रयोगशाळेत वैज्ञानिकांकडुन राँकेट इंधन म्हणुन देखील केला जातो
4)इथेनॉलचा वापर केल्याने हवेतील नायट्रोजन आँक्साईडचे उत्सर्जन देखील कमी होत असते. आणि प्रदूषण रोखण्यासाठी फायदेशीर ठरते.

English Summary: Sharad Pawar inaugurates large ethanol plant at sugar factory in Jalna district today
Published on: 16 April 2022, 11:33 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)