गेल्यावर्षी दूध देणाऱ्या गायी म्हशींवर आलेल्या लम्पी रोगाने अनेक गाई मृत्युमुखी पडल्या. यामुळे दूध उत्पादनात मोठी घट झाली आहे. भारत जगातला सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. सुमारे 22 कोटी टन दूधाचे उत्पादन देशात होत असून जगाच्या तुलनेत 24 टक्के दूध उत्पादन आपल्या देशात होते.
यंदा सरकारला अंदाजापेक्षा कमी दूधाचे उत्पादन होण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने यंदा देशाला गरज पडल्यास दूग्धजन्य पदार्थांची आयात करावी लागेल असा अंदाज व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचं (Sharad Pawar) केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री पुरूषोत्तम रूपालांना पत्र लिहिले आहे. दुग्धजन्य पदार्थांची आयात न करण्याची विनंती केली आहे.
भारतीय दूध उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान होण्याची भीती पत्रातून व्यक्त केली आहे. मागच्या 15 महिन्यात दुधाच्या दरात तब्बल 12 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली असतानाही दुधाचे उत्पादन मात्र वाढत नाही म्हणून अखेर देशाला हा निर्णय घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महावितरण घेणार तब्बल २९ हजार २३० कोटींचे कर्ज, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता..
सद्यस्थितीत देशाला दुधाची कमतरता जाणवत नसली तरी आगामी काळात मात्र दुग्धजन्य पदार्थाची कमतरता भासणार आहे. मागच्या वर्षभरात दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली नाही. दक्षिणेकडील राज्यात दूधाचा स्टॉकचा अंदाज घेतल्यानंतर जर गरज वाटली तर सरकार लोणी, तूप आदी दूग्धजन्य पदार्थांची आयात करू शकते.
कोरोना साथीमुळे उलट दूधाची मागणी वाढली होती. या काळात दूधाच्या घरगुती मागणीत 8 ते 10 टक्के वाढ झाली आहे. सध्या डेअरी उत्पादनाची स्थिती नीट नाही. दुग्धजन्य पदार्थांची टंचाई जाणवू शकते. तुप, लोणी, पनीर आदी पदार्थांचे उत्पादन घटण्याचा अंदाज आहे.
त्वचेच्या लम्पी आजाराने 1.89 लाख गुरांचा मृत्यू आणि कोरोना साथीत दूधाची मागणी वाढूनही देशाचे दूध उत्पादन स्थिर राहीले. आता मात्र मागणी वाढली आहे. यामुळे दुधाचे दर वाढण्याची शक्यता आहे.
आयकर विभागाकडून देशातील जनतेवर ४४ हजार कोटीची दरोडा, राजू शेट्टी यांच्या आरोपाने खळबळ
PNG-CNG चे दर कमी होणार, दर महिन्याला ठरणार दर, केंद्र सरकारचा मोठा निर्णय..
Published on: 07 April 2023, 03:20 IST