News

शरद पवारांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगली आहे. पवारांनी असे वक्तव्य करण्यामागे नेमकी कोणती खेळी आहे? पवार असं वक्तव्य करुन का संभ्रम निर्माण करत आहेत? असा सवाल या निमित्ताने केलं जात आहे.

Updated on 01 September, 2023 10:56 AM IST

Sharad Pawar On Ajit Pawar 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसवा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजित पवार आमचेच नेते आहेत, असं विधान सकाळी केलं होतं. या विधानानंतर अवघ्या पाच तासांत शरद पवार यांनी यूटर्न घेतला आहे. अजित पवार आमचे नेते आहेत, असं विधान मी केलंच नाही, असा दावा शरद पवार यांनी केला आहे. मात्र, पक्षात फूट पडलेली नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे पुन्हा एकादा तर्कविर्तक चर्चांना उधाण आलं आहे.  साताऱ्यात (Satara) माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं.

शरद पवारांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगली आहे. पवारांनी असे वक्तव्य करण्यामागे नेमकी कोणती खेळी आहे? पवार असं वक्तव्य करुन का संभ्रम निर्माण करत आहेत? असा सवाल या निमित्ताने केलं जात आहे. तसेच अजित पवार यांना पक्षात पुन्हा संधी नसल्याचंही शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

अजित पवार यांना राष्ट्रवादीत पुन्हा संधी देणार का? असा सवाल शरद पवार यांना करण्यात आला. पहाटे शपथविधी झाला त्यानंतर आम्ही त्यांना संधी दिली. आता परत संधी द्यायची नसते आणि मागायची नसते, असं उत्तर शरद पवार यांनी दिलं आहे. शरद पवार यांच्या या भूमिकेमुळे अजित पवार यांना आता राष्ट्रवादीतील परत जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचा संदर्भ देताना शरद पवार म्हणाले की, "अजित पवार आमचे नेते आहेत असं मी म्हणालो नाही. सुप्रिया त्यांची धाकटी बहिण आहे. बहिण भावाच्या नात्यात सहजपणे बोलत असतील तर त्याचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही." "आज जी भूमिका आमच्या सहकाऱ्यांनी घेतली ते आमचे कुणाचेही नेते नाहीत," असं शरद पवार यानी स्पष्ट केलं.

English Summary: Sharad Pawar changed stance on Ajit Pawar The program itself spoke clearly
Published on: 25 August 2023, 03:05 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)