गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी कृषिमंत्री शरद पवार पंतप्रधान होणार का याची चर्चा सुरू आहे. प्रत्येक निवडणुकीत त्यांचे नाव घेतले जाते. असे असताना आता त्यांनीच याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
शरद पवार म्हणाले, की वयाच्या 81 व्या वर्षी पंतप्रधान होणार्या मोरारजी देसाई यांचा कित्ता मी गिरवू इच्छित नाही. आता सक्तीची कुठलीही जबाबदारी घेणार नाही, अशा शब्दांत पवार यांनी आपण पंतप्रधानपदाचा उमेदवार नसल्याचे सांगितले आहे.
ते म्हणाले, लोकशाही वाचविण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्यासाठी गरज आहे. भाजपला देशपातळीवर पर्याय उभे करण्यासाठी समविचारी लोकांना एकत्र आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. ते ठाण्यात बोलत होते. आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी ते मैदानात उतरले आहेत.
मोठी बातमी! दूध संघावर एकनाथ खडसे यांचे वर्चस्व, महाजन गटाला मोठा धक्का..
तसेच पवारांचे बोट पकडून राजकारणात आल्याचे पंतप्रधान मोदी हे नेहमी सांगत असतात. पण आता माझे बोट इतके महाग पडेल असे देशाला वाटले नव्हते, असेही ते म्हणाले. यामुळे सध्या याची चर्चा सुरू आहे.
Sugar Production; देशातील साखरेचं अतिउत्पादन ही अर्थव्यवस्थेसाठी समस्या, साखरेचं उत्पादन कमी करा..
केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर जनतेतून सत्ता मिळत नसल्याने ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यासारख्या यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांवर कारवाई केली जात आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
महत्वाच्या बातम्या;
आता शेतकऱ्यांना मिळणार शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरणासाठी १ लाख रुपये, जाणून घ्या..
LIC ची जबरदस्त स्कीम, 122 रुपयांची बचत करून तुम्हाला मिळणार 26 लाख, जाणून घ्या..
कृषी अधिकारी असल्याचे सांगून खत विक्रेत्यांकडे पैशांची मागणी, अनेक तक्रारी दाखल..
Published on: 31 August 2022, 10:42 IST