News

Shahajibapu Patil: परतीच्या पावसाने राज्यात सर्वदूर पावसाने धुमाकूळ घातला आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे.

Updated on 30 October, 2022 6:39 PM IST

Shahajibapu Patil: परतीच्या पावसाने राज्यात सर्वदूर पावसाने धुमाकूळ घातला आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे.

सांगोला तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी अधिकाऱ्यांसमवेत आज अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांची भेट घेऊन संवाद साधला.

सांगोला तालुक्यातील चार सर्कलमध्ये अतिवृष्टी होऊन पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अद्याप शेतात पाणी असून, ओढे नाले तुडुंब भरुन वाहत आहेत.

हेही वाचा: पेट्रोल आणि डिझेलमध्ये काय फरक आहे? बाईक डिझेलवर का चालत नाही? जाणून घ्या उत्तर

सांगोला तालुक्यातील संगेवाडी परिसरात 990 मिलीमीटर म्हणजे सरासरीच्या 167 टक्के एवढा पाऊस झाला आहे. पाऊस थांबून 12 दिवस उलटले तरी अजून पिकातून पाणी वाहत आहे. सांगोला तालुक्यातील जवळपास 75 गावे अतिवृष्टीमुळं बाधित झाली आहेत.

हेही वाचा: मोठी बातमी! दूध दरात होणार वाढ; दूध संघांची पुण्यात बैठक

त्यामुळं ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी आमदार शहाजीबापू यांच्यासमोर केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या निकषात बसवून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देणार असल्याचे यावेळी शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा: मुसळधार पाऊसानंतर राज्यात किती असणार थंडी; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

English Summary: Shahajibapu directly on the dam of farmers
Published on: 30 October 2022, 06:39 IST