News

शासनाच्या विविध प्रकारच्या कृषी विभागाच्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या कृषी अवजारांना प्रमाणित करण्यासाठी राज्यातील चार कृषी विद्यापीठांमध्ये लागणार्या् सगळ्या आवश्यक सुविधा उभारण्यासाठी तातडीने प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश कृषि मंत्री श्री. दादाजी भुसे यांनी दिले.

Updated on 11 December, 2021 12:16 PM IST

शासनाच्या विविध प्रकारच्या कृषी विभागाच्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या कृषी अवजारांना प्रमाणित करण्यासाठी राज्यातील चार कृषी विद्यापीठांमध्ये लागणार्‍या सगळ्या आवश्यक सुविधा उभारण्यासाठी तातडीने प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश कृषि मंत्री श्री. दादाजी भुसे यांनी दिले.

हे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर केंद्राच्या योजनांमधून निधी मिळवून या विद्यापीठांमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही तातडीने केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. एकादशी शेती अवजारांची किंमत जर 35 हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्या यंत्राची केंद्र सरकारने अधिसूचित केलेल्या संस्थांकडून चाचणी करून प्रमाणित करून घेण्याच्या मार्गदर्शिका केंद्राने दिलेले आहेत. या अधिसूचित संस्थांमध्ये महाराष्ट्रातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांचा समावेश आहे.

 कृषी विभागाच्या योजना मधून शेतकऱ्यांना यंत्र पुरवल्या नंतर त्या यंत्रांची चाचणी करून घेणे आवश्यक असते. ट्रॅक्टर ट्रेलर या यंत्रासाठी चाचणीची व्यवस्था नसल्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यास अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी यासंदर्भात विभागीय अधिकारी यांची बैठक घेऊन या विषयावर चर्चा केली. यंत्र प्रमाणित करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या संस्थांकडून ते प्रमाणित करून घ्यावे आणि कमी रकमेत सध्याच्या केंद्रामध्ये व्यवस्था उभी करून यंत्रसामग्री प्रमाणित करून घेण्याच्या सूचनाही कृषिमंत्री श्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिले

 राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत ट्रॅक्टर ट्रेलर या यंत्रासाठी मुंबईच्या व्हीजेटीआय यांचा चाचणी अहवाल ग्राह्य धरण्याच्या विषयावर कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.व्ही सी द्वारे  झालेल्या या बैठकीस कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले,कृषी संचालक दिलीप झेंडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ( संदर्भ- स्थैर्य)

English Summary: set up nesesarry facility for agri machinary report in 4 agri university
Published on: 11 December 2021, 12:16 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)