1. बातम्या

शेतकऱ्यांसाठी रेशीम शेती फायदेशीर

KJ Staff
KJ Staff


मुंबई:
राज्याची भौगोलिक परिस्थ‍िती आणि हवामान अंदाज पहाता रेशीम शेती ही शेतकऱ्यांना फायदेशीर आहे. या शेतीसाठी कमी खर्च लागतो आणि पाण्याचे प्रमाण कमी असतानाही उत्पादन येते. त्यामुळे रेशीम शेती ही ग्रामीण भागातील लोकांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी फायदेशीर आहे, असे वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.

श्री. देशमुख म्हणाले, राज्यामध्ये तुती रेशीम व टसर (वन्य) रेशीम असे दोन प्रकारचे रेशीम उद्योग आहेत. तुती रेशीम उद्योग पुणे, औरंगाबाद, अमरावती व नागपूर विभागात एकूण 24 जिल्ह्यात सुरु आहेत. तर टसर रेशीम उत्पादन प्रामुख्याने नागपूर विभागातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया व चंद्रपूर या जिल्ह्यात घेतले जाते. इतर पिकांच्या तुलनेत तुती रेशीम उद्योग शेतकऱ्यांनी केल्यास त्यांचे उत्पादन दोन वर्षात दुप्पट होते. ऊस, केळी, द्राक्षे, कापूस, सोयाबीन, संत्रा या पिकांचे उत्पादन पाहता शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्याची क्षमता रेशीम उद्योगामध्येच आहे. त्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम उद्योग करावा.

रेशीम कोषाला बाजारपेठेमध्ये मोठी मागणी आहे. सद्यस्थितीत कोषाचे दर 300 ते 350 रुपये प्रतिकिलो आहेत. एकदा तुती लागवड केल्यानंतर ही लागवड ही 10 ते 15 वर्ष टिकते आणि दुसऱ्या वर्षापासून सरासरी 4 ते 5 पिके घेता येतात. तुती लागवडीवर अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, गारांचा पाऊस इत्यादी नैसर्गिक आपत्तीचा परिणाम होत नाही. तसेच तुतीच्या पानाचा उपयोग दुभत्या जनावरांसाठी सुद्धा करता येतो. तुती रेशीमवर कुठल्याही प्रकारचे औषध फवारणी नसल्यामुळे तसेच सेंद्रीय खतांचा वापर केल्यामुळे जमिनीची कस टिकून राहते. त्यासाठी शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळले पाहिजे असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.

संबंधित बातमी वाचण्यासाठी: रेशीम उत्पादक शेतकऱ्यांची शिखर संस्था तयार करावी

तुती रेशीम व इतर पिकांची तुलनात्मक माहिती:

ऊस: एक एकर, पिकाचा कालावधी-तीन वर्ष, उत्पादन सुरुवात-1 वर्ष 5 महिने, पाण्याची आवश्यकता दोन हजार एमएम 420 दिवसांकरिता, भरपूर खते-आवश्यकतेनुसार कीटकनाशके, उत्पन्न सरासरी 50 टन, सरासरी दर-तीन हजार प्रती टन, निव्वळ उत्पन्न-52 हजार रुपये.

केळी: एक एकर, पिकाचा कालावधी-1 वर्ष 5 महिने, उत्पादन सुरुवात, दोन वर्षपाण्याची आवश्यकता 4275 एमएम 420 दिवस, खते भरपूर, आवश्यकतेनुसार कीटकनाशके, उत्पन्न सरासरी-15 टन, सरासरी दर 10 हजार प्रती टन, निव्वळ उत्पन्न 1 लाख रुपये.

द्राक्ष: एक एकर, पिकाचा कालावधी-5 वर्ष, उत्पादन सुरुवात-दोन वर्ष, खते भरपूर, आवश्यकतेनुसार कीटकनाशके, उत्पन्न सरासरी-5 टन, सरासरी दर 40 हजार प्रती टन, निव्वळ उत्पन्न तीन लाख रुपये.

कापूस: एक एकर, पिकाचा कालावधी-10 महिने, उत्पादन सुरुवात-चार ते दहा महिने, पाण्याची आवश्यकता, कोरडवाहू/ओलित शेती, खते भरपूरआवश्यकतेनुसार कीटकनाशके, उत्पन्न सरासरी-15 क्विंटल, सरासरी दर 5 हजार ते 10 हजार प्रति क्विंटल, निव्वळ उत्पन्न 50 हजार रुपये.

सोयाबीन: एक एकर, पिकाचा कालावधी- चार महिने, उत्पादन सुरुवात- तीन ते चार महिने, पाण्याची आवश्यकता, कोरडवाहू शेती, खताचे प्रमाण कमीआवश्यकतेनुसार कीटकनाशके, उत्पन्न सरासरी-10 क्विंटल, सरासरी दर तीन हजार ते चार हजार प्रति क्विंटल, निव्वळ उत्पन्न 30 हजार रुपये.

संत्रा: एक एकर, पिकाचा कालावधी-15 वर्ष, उत्पादन सुरुवात- चार ते पाच वर्षपाण्याची आवश्यकता 1150 एमएम, 420 दिवसांकरिता, खताचे प्रमाण कमीआवश्यकतेनुसार कीटकनाशके, उत्पन्न सरासरी-20 टन, सरासरी दर पाच हजार प्रती क्विंटल, निव्वळ उत्पन्न एक लाख 30 हजार रुपये.

रेशीम शेती: एक एकर, पिकाचा कालावधी-10 ते 15 वर्ष, उत्पादनाला सुरुवात-6 महिने, पाण्याची आवश्यकता-1440 एमएम 420 दिवसांकरिता, खताचे प्रमाण कमी, कीटकनाशके फवारणी नाही, उत्पन्न सरासरी (400 किलो कोष), सरासरी दर-300 ते 350 प्रतिकिलो दर, निव्वळ उत्पन्न 1 लाख 20 हजार.

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters