परभणी: परभणी आत्मा (कृषि विभाग) आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रेशीम संशोधन योजना यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे पेठशिवणी (ता. पालम जि. परभणी) येथे दिनांक 16 मार्च रोजी तुती रेशीम उद्योग प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. मौजे पेठशिवणी येथील शेतकरी श्री. हरीभाऊ कंजाळकर यांचे शेतावर हे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अनंतराव करंजे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नाबार्डचे विभागीय व्यवस्थापक पी. एम. जंगम, पालम पंचायत समितीचे सभापती प्रशांत वाडेवाले, माजी सरपंच विनायक वाडेवाले, रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. सी. बी. लटपटे आदींची उपस्थिती होती.
नाबार्डचे विभागीय व्यवस्थापक श्री. पी. एम. जंगम यांनी आपल्या भाषणात शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून रेशीम कोषापासुन धागा निर्मिती करण्यासाठी नाबार्ड बॅकेकडे प्रकल्प सादर केल्यास जिल्हयात सर्वतोपरी सहकार्य आश्वासन दिले. मार्गदर्शनात रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. सी. बी. लटपटे म्हणाले की, कृषी विद्यापीठ, जिल्हा रेशीम कार्यालयात किंवा ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था मार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या रेशीम उद्योगाचे प्रशिक्षणात सहभाग घेऊन तुती लागवड व दर्जेदार उत्पादन कौशल्य आत्मसात करण्याचा सल्ला दिला.
कार्यक्रमास रमेश शिनगारे, रावसाहेब शिनगारे, रूपेश शिनगारे, चेअरमन बालाजी वाडेवाले, नारायण कंजाळकर, हरिश्चंद्र ढगे आदीसह रेशीम उद्योजक शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
Published on: 25 March 2019, 08:09 IST