News

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात मोदी सरकारने शेतकऱ्यांना ३.३६ कोटी रुपयांचा पहिला हफ्ता दिला. आपणास याचा लाभ मिळाला नसेल तर आपण कृषी अधिकाऱ्याशी संपर्क करु शकता.

Updated on 25 March, 2020 9:35 AM IST


पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात मोदी सरकारने शेतकऱ्यांना ३.३६ कोटी रुपयांचा  पहिला हफ्ता दिला.  आपणास याचा लाभ मिळाला नसेल तर आपण कृषी अधिकाऱ्याशी संपर्क करु शकता. किंवा तुम्ही कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या टोल फ्री नंबरवर संपर्क करु शकता. (PM-Kisan Helpline 155261 किंवा 1800115526 याशिवाय तुम्ही 011-23381092 वर संपर्क करुन आपल्या समस्येचे निरसन करु शकता.

ही योजना चालू करताना पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत पूर्ण पार्दशकता असेल, असे सांगितले होते.  याच पार्श्वभूमीवर सरकारने पावले उचलली आहेत.  योजनेच्या  लाभार्थ्यांची यादी ग्राम पंचायतमध्ये प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांची यादी पीएम किसान पोर्टलवर अपलोड करण्यात येईल.  दरम्यान ज्या शेतकऱ्यांना आपण या योजनेसाठी पात्र आहोत असे वाटते ,  परंतु आपले नाव यादीत आले नाही, असे शेतकरी आपल्या तालुक्यातील किंवा जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आपली समस्य़ा सांगू शकता.

यासह ज्या शेतकऱ्यांचा आधार नंबर, नाव, बँक खाते क्रमांक  चुकीचा असल्यामुळे या योजनेचा लाभ घेऊ शकले  नाहीत. अशा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आपली समस्या घेऊन कृषी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. कार्यालयात न जाता तुम्ही आपली समस्या घरी बसून सोडवू शकता. कृषी विभागाकडून जारी करण्यात आलेल्या व्हाट्सअॅप नंबरवर तुम्ही आपले आधार कार्ड आणि बँख पासबुकचे फोटो पाठवू शकता आणि आपल्या समस्येचे निरसन करु शकता. उत्तर प्रदेशातील सरकारने या उपक्रमाची सुरुवात केली आहे.

English Summary: Send passbook and aadhar card number to get benefits of pm kisan scheme
Published on: 24 March 2020, 03:34 IST