राज्यातील विविध शासकीय विभागातील तूरडाळ मागणी आणि पुरवठा यांच्या व्यवस्थापनासंबंधी पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी आढावा घेतला. तूरडाळीचा उपलब्ध साठा वेळेत विक्री करण्यासंबंधीचे निर्देश पणन महासंघाला यावेळी देण्यात आले. मंत्रालयातील दालनात तूर विक्री व्यवस्थापनाबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री. देशमुख बोलत होते.
यावेळी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे उपसचिव सतीश सुपे, पणन महासंघाचे (मुंबई) व्यवस्थापकीय संचालक डॉ.वाय. पी. म्हसे, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुहास दिवसे, नाफेडचे (नवी दिल्ली) व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार चढ्ढा आदी उपस्थित होते.
Published on: 08 August 2018, 12:11 IST