News

मागील हंगामातील उसाचा दुसरा हप्ता ४०० रुपये द्यावा आणि यंदाच्या गाळप होणाऱ्या उसाला पहिली उचल ३५०० रूपये द्यावी, या मागण्यांसाठी स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज पासून कोल्हापुरात पुणे बंगळूर महामार्गावर बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरु केलं आहे. 21 नोव्हेंबरपर्यंत या मागण्यांवर तोडगा न निघाल्यास महामार्ग रोखण्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली होती. त्यानुसार आज राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली पुलावर हे आंदोलन सुरू झालं आहे. गेल्या 4 तासांहून अधिक काळ हे आंदोलन सुरू असून हजारो शेतकरी राजू शेट्टी यांच्या समवेत महामार्गावर बसले आहेत. त्यामुळे हायवेवर आता पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु करण्यात आली आहे.

Updated on 23 November, 2023 6:05 PM IST

यासंर्दभातील एक व्हिडीओ राजू शेट्टी यांनी ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. त्यात ते म्हणाले की मी आता कोल्हापूरला पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखण्यासाठी निघालेलो आहे. कोल्हापुरात जाऊन अंबाबाईचे दर्शन घेऊन माझ्या शेतकऱ्यांना हक्क मिळवून दे असं साकडं घालणार आहे. माझा बऱ्याच सहकाऱ्यांना पहाटे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पण मी त्याठिकाणी आहे. ज्याला जो मार्ग मिळेल त्या मार्गाने पोलिसांना चुकवत या. असं राजू शेट्टी म्हणाले.

तसेच मागं राहिलेल्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, आम्ही जो पर्यंत रस्त्यावर आहे तो पर्यंत साखर कारखाने चालु करण्याचे कारस्थान साखर कारखांदार करण्याची शक्यता आहे.कारण तूमच्या ऊसाचे त्यांना लचके तोडायचे आहेत. मागच्या वर्षाचेही पैसे द्यायचे नाहीत आणि या वर्षी किती देणार ते सुद्धा त्यांना सांगायचे नाही आहे. एकूणच ही चळवळ चिरडायची असा त्यांचा डाव आहे.हातामध्ये उसाचा बुडका घ्या आणि लुंग्या-सूनग्यांचा बंदोबस्त करा. एक लक्षात ठेवा ही आरपारची लढाई आहे. कसल्याही परिस्थित या कारखांदारांसमोर झुकायचे नाही. मागिल वर्षासाठी किमान 100 रूपये घेतल्या शिवाय आता मागे हटायचे नाही असे आवाहन राजू शेट्टी यांनी व्हिडीओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केलं आहे.

राजू शेट्टी यांच्या या आवाहनाला मोठ्या संख्येने शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊसाला दर मिळावा यासाठी आंदोलन सुरू आहे. मात्र अजुनही ऊस दराबाबत कोणताच तोडगा निघाला नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना अधिकच आक्रमक झाली आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागू नये, यासाठी कडक पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे.

English Summary: Self-respect indefinite chakkajam movement starts from today
Published on: 23 November 2023, 06:05 IST