महाडीबीटी पोर्टलची रचनाही अनेक प्रकारच्या योजनांसाठी एका ठिकाणी आणि एकच अर्ज करता यावे यासाठी केली गेली आहे. त्यामुळे विविध प्रकारचे योजना या एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिले गेले आहेत.
त्याच अनुषंगाने आता राज्य शासनाने महाडीबीटी पोर्टलमध्ये बियाण्यांचा देखील समावेश केला आहे. महाडीबीटी पोर्टल अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी येत्या १५ मेपर्यंत शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करता येईल असे कृषी आयुक्तालयने म्हटले आहे. याअंतर्गत तूर, मुग, उडीद,, मका, बाजरी, भात इत्यादी बियाणे हे अनुदानावर मिळू शकतील. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानातून ही सुविधा मिळणार आहे, असे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी स्पष्ट केले आहे.
या योजनेचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी गावातून कॉमन सर्विस सेंटर, ग्रामपंचायतीच्या संग्राम केंद्र, तसेच स्वतःचा लॅपटॉप अथवा मोबाईल च्या मदतीने या योजनेचा फायदा घेता येईल. त्यासाठी शेतकऱ्यांनी mahadbtmahait.gov. in या संकेतस्थळावर शेतकरी योजना असा पर्याय आधी निवडावा. नंतर पोर्टलवर विविध माहिती भरल्यानंतरसंबंधित अर्ज हा ग्राह्य धरला जाणार आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रमाणित बियाण्यासाठी दोन हेक्टरपर्यंत लाभ मिळू शकेल. जर या योजनेबाबत इतके अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण आल्यास तर शेतकऱ्यांनी helpdeskdbtfarmer@gmail.com या मेलवर संपर्क साधावा अथवा 020-25511479 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल. ज्या शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करायची असेलअशा शेतकऱ्यांनी महाडीबीटी संकेतस्थळावर संकेतस्थळावर त्यांचा आधार क्रमांक प्रमाणित करून घ्यावा लागेल.
Published on: 11 May 2021, 05:57 IST