News

राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतो आहे. रोज हजारो रुग्ण आढळत आहेत. मृतांचा आकडासुद्धा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याने कोरोनाला थोवण्यासाठी संचारबंदी लागू केली आहे.

Updated on 20 April, 2021 9:01 PM IST

राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतो आहे. रोज हजारो रुग्ण आढळत आहेत. मृतांचा आकडासुद्धा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याने कोरोनाला थोवण्यासाठी संचारबंदी लागू केली आहे.

राज्यातील अत्यावश्यक वस्तूंच्या दुकाने सकाळी ७ ते ११ पर्यंतचं सुरू राहणार आहेत. यामुळे शेतीची कामे कसे होतील असा प्रश्न बळीराजाला पडला असेल. शेतकऱ्यांचा समस्या लक्षात घेता राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक नियंत्रण कक्ष कार्यान्वित केले आहे. सध्या असलेल्या निर्बंधकाळात यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते, बियाणे, तसेच शेतीचे इतर सामान यांचा पुरवठा होण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. या सर्व गोष्टींचा पुरवठा सुरळीत व्हावा आणि त्यामध्ये काही अडचण आल्यास त्याचे निवारण व्हावे म्हणून कृषी आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी तसे निर्देश दिले होते.

सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत संपर्क करा

खते, बियाणे तसेच इतर अडचणी आल्यास राज्य सरकारने शेतकऱ्यांना थेट टोल फ्री नंबरवर कॉल करण्यास सांगितले आहे. त्यासाठी 8446117500 हा भ्रमणध्वनी क्रमांक असून 18002334000 हा टोल फ्री क्रमांक आहे. शेतकऱ्यांना कोणतीही अडचण असेल तर त्यांनी नियंत्रण कक्षाशी वरील नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात आले आहे. हे नंबर सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरु राहतील. सोबतच अडचण किंवा तक्रार असेल तर controlroom.qc.maharashtra@gmail.com यावर मेलवरसुद्धा ती नोंदवता येईल.

 

यावेळी टोल फ्री जाहीर करताना राज्य सरकारने शेतीविषयक सामानांची किंमत किंवा साठेबाजीबाबत काही तक्रारी असतील तर शक्यतो नाव, पत्ता, संपर्क क्रमांक आणि अडचणी किंवा तक्रारींचा संक्षिप्त तपशील द्यावा असे राज्य सरकारने आवाहन केले आहे. तसेच सर्व तक्रार कागदावर लिहून त्याचे छायाचित्र शक्य असेल तर व्हॉट्सअ‌ॅपवर किंवा ई-मेलवर पाठवावी. त्यामुळे तक्रारींचे निराकरण करणे सोईस्कर होईल, असेसुद्धा राज्य सरकारने म्हटले आहे. ज्या शेतकऱ्यांना हे शक्य नसेल त्यांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला तरीसुद्धा काहीही अडचण नसल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.

दरम्यान, यापूर्वी लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. शेतकऱ्यांना औषधी, खते, बियाणे तसेच इतर शेतीविषयक उपकरणं वेळेवर मिळत नव्हते. याच गोष्टीचा विचार करुन कृषी विभागाने वरील संपर्क क्रमांक जारी केले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मदत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

English Summary: Seeds, fertilizer not available during lockdown; Then call this number
Published on: 20 April 2021, 09:01 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)