News

परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी चॅप्टर ऑफ इंडियन सोसायटी ऑफ एग्रोनोमी व कृषीविद्या विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऊस उत्पादनाचे आधुनिक तंत्रज्ञान’ या विषयावर कोईम्बतुर (तामिळनाडू) येथील ऊस पैदास संस्थेचे वरिष्ठ शास्‍त्रज्ञ डॉ. अर्जुन तायडे यांच्‍या व्याख्यान दि. 19 जून रोजी आयोजित करण्यात आले होते.

Updated on 28 June, 2019 8:16 AM IST


परभणी:
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी चॅप्टर ऑफ इंडियन सोसायटी ऑफ एग्रोनोमी व कृषीविद्या विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऊस उत्पादनाचे आधुनिक तंत्रज्ञान’ या विषयावर कोईम्बतुर (तामिळनाडू) येथील ऊस पैदास संस्थेचे वरिष्ठ शास्‍त्रज्ञ डॉ. अर्जुन तायडे यांच्‍या व्याख्यान दि. 19 जून रोजी आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले व विभाग प्रमुख डॉ. वा. नि. नारखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ. अर्जुन तायडे यांनी उपस्थित पदव्युत्तर व आचार्य पदवीच्या विद्यार्थ्‍यांसोबत अभ्यासक्रमीय सुसंवाद साधून ऊस उत्पादनाचे आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन करून वर्तमान कालीन व भविष्यातील संशोधनातील अडचणी व त्याचे निरसनात्मक नियोजन याविषयी सविस्तर चर्चा केली. भविष्यात ऊसाच्या बियाण्यापासुन रोप निर्मिती शक्य होणार असुन यामुळे बेण्यावरील खर्चात बचत होईल, असे सांगितले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. पी. के. वाघमारे यांनी केले. विभाग प्रमुख डॉ. वा. नि. नारखेडे व प्रक्षेत्र अधीक्षक प्रा. पी. के. वाघमारे यांनी विभागाच्या प्रक्षेत्रावरील ऊस आंतरपीक पध्दतीतील प्रात्याक्षिक व बिजोत्पादनाबद्दल माहिती दिली. कार्यक्रमास डॉ. बी. व्ही. आसेवार, डॉ. ए. एस. कारले, डॉ. करंजीकर, डॉ. व्ही. बी. अवसरमल, डॉ. आय. ए. बी. मिर्झा, प्रा. जी. डी. गडदे, प्रा. एस. यू. पवार, डॉ. मेघा सुर्यवंशी, प्रा. ज्योती गायकवाड आदीसह पदव्युत्तर विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

English Summary: Seedling Production Possible from Sugarcane Seed
Published on: 28 June 2019, 08:14 IST