दोन महिन्यापूर्वी मराठवाड्यातील पैठण येथे मोसंबी फळाची व्यवस्थापनासाठी आणि त्याची प्रतवारी टिकेल यासाठी पैठण येथे तब्बल 62 एकर जागेमध्ये सिट्रस इस्टेट स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती व त्यानुसार यासाठी निधी देखील उपलब्ध झाला आहे.
त्या पाठोपाठ आता शासनाने मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातसीड पार्क उभारले जाणार आहे गेल्या पाच वर्षापासून हा प्रकल्प रखडला होता. अखेर महाबीज कडून हा प्रकल्प अहवाल कृषी सचिवांना सादर करण्यात आला आहे.त्यानुसार काही दिवसांमध्ये सीड पार्क उभारले जाणार असल्याचे महाबीज च्या वतीने सांगण्यात आले आहे.
जालन्यात माती परीक्षण व शेतकऱ्यांना शेतीमाल ठेवण्यासाठी गोदाम के उद्दिष्ट निश्चित करून तत्कालीन मंत्री बबनराव लोणीकर यांनी सीड पार्क उभारण्याची घोषणा केली होती.
त्यानंतर एमआयडीसीच्या यंत्रणेमुळे अंतर्गत हा सीड पार्क उभारण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या.मात्र निधीअभावी हे काम रखडले होते.या समस्या असताना देखील एक खाजगी कंपनी समोर आली होती. परंतु या कंपनीने अधिक पैशाची मागणी केल्याने या प्रकल्पाचे काम लांबणीवर पडले होते. परंतु आता महाबीज कडून प्रस्ताव सादर झाल्याने सिड प्रोजेक्ट उभा राहिल असे आशादायक चित्र आहे.
जालना येथे उभारल्या जाणाऱ्या या सीडी पार्कमध्ये शेतकऱ्यांना आवश्यक अशा सर्व सुविधा राहणार आहेत. बियाण्यासाठी आवश्यक अशा सगळ्या प्रक्रिया या ठिकाणी केल्या जाणार आहेत. एकाच छताखाली सर्व प्रक्रिया पार पाडण्याच्या उद्देशाने हा प्रोजेक्ट राबवला जाणार आहे आणि याकरिता 85 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.(स्त्रोत-tv9 मराठी)
Published on: 24 January 2022, 06:48 IST