News

अनेकांना वेगवेगळे छंद असतात तसेच अनेक गोष्टींची आवड असते. यामधून ते नक्कीच वेगळे काहीतरी करून दाखवतात. आता अशाच एका ध्येयवेड्याने सीड बँक बनवली आहे. यामुळे त्याचे कौतुक केले जात आहे.

Updated on 17 February, 2022 10:56 AM IST

अनेकांना वेगवेगळे छंद असतात तसेच अनेक गोष्टींची आवड असते. यामधून ते नक्कीच वेगळे काहीतरी करून दाखवतात. आता अशाच एका ध्येयवेड्याने सीड बँक बनवली आहे. यामुळे त्याचे कौतुक केले जात आहे. लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील शिवशंकर चापुले या तरुणाने वाणाची सीड बँक तयार केली आहे. आज त्याच्या जवळ 75 देशी वाणाची बियाणे असून राज्यभर वृक्षप्रेमींना मोफत वाटत आहेत. यामुळे अनेक जुन्या झाडांचे देखील यामधून संवर्धन होत आहे. यामुळे हा एक कौतुकास्पद उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे.

शिवशंकर चापुले हा 12वी पास मात्र त्याला बालपणापासून झाडांच्या निरीक्षणची आवड लागली. त्यातूनच त्याला विविध झाडाच्या बिया गोळा करण्याचा छंद लागला, आणि त्याने हे काम हाती घेतले. त्यामध्ये त्याला यश देखील मिळाले. बघता बघता त्याने 75 प्रकारच्या देशी वाणाच्या बियाणांची बँक तयार केली आहे. तसेच तो अनेकांना या बिया देत असल्याने वृक्षलागवड देखील होत आहे. अनेकजण त्यांच्याकडे या बियांची माहिती घेण्यासाठी येत असतात. ते सगळ्यांना याबाबत माहिती देखील देतात.

पर्यावरण प्रेमी शिक्षक मिलींद गिरीधारी आणि पोलीस अधिकारी धनंजय गुट्टे यांचे प्रोत्साहन मिळाल्याने त्याला देशी झाडाच्या बियांची बँक करण्याचे प्रोत्साहन मिळाले असल्याचे ते सांगतात. शिवशंकर चापुले यांनी या देशी वाणाच्या झाडाची लागवड वाढावी यासाठी फेसबुकवर माहिती पोस्ट करत सीड बँक तयार केली. अनेकजण व्यक्तिगत पातळीवर व संस्थात्मक पातळीवर झाडे लावण्याचे कार्य अनेक ठिकाणी सुरू आहे. असे असताना पर्यावरणाला फायदा न होणारी झाडे देखील लावली जातात.

त्यांनी स्थानिक देशी वाणांची झाडे लावली जावीत. या झाडाचा फायदा जैवविविधता यासाठी व्हावा, यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांनी रेणापूर येथील निसर्ग मित्र शिवशंकर चापुले यांनी परिसरात फिरून निर्मल पंधरा पांगारा शमी मास रोहिणी या विविध देशी झाडाच्या दुर्मिळ होत असलेले औषधी वनस्पतीच्या बिया जमा केल्या व फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून मोफत वाटप केल्या. यामुळे आता ही झाडे वाढण्यास मदत होणार आहे. अशाप्रकारे आपण निसर्गाचे रक्षण करण्यास हातभार लावावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

English Summary: Seed Bank created 12th Learning Goal, distributes free seeds across
Published on: 17 February 2022, 10:56 IST