आज सर्वपक्षीय युवक शेतकरी यांची प्रशासक,कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती यांना निवेदन देण्यात आले अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत पावसामुळे शेतकऱ्यांच्या धान्याचे झालेले नुकसान भरपाईचे तात्काळ पंचनामे करून नुकसा भरपाई मिळणेबाबत काल दिनांक १८ जून २०२२ रोजी मृग नक्षत्राचे मुहूर्तावर झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याने विक्रीस आणलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आवक झालेल्या धान्याची मोठ्या प्रमाणात पावसामुळे नुकसान झालेले आहेत.
शेतकऱ्याचे धान्य व शेतकरी सुरक्षित रहावे या उद्देशाने शासनाने खुल्या बाजारात धान्याची विक्री वा खरेदी न करता शासनाने उभारलेल्या गोदामात शेतकऱ्यांचे संपूर्ण धान्याची खरेदी / विक्री व्हावी हा शासनाचा उद्देश असतानाही शेतकऱ्यांना शासनाने वाऱ्यावर सोडलेले आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीने शासन स्तरावर भविष्यात शेतकऱ्यांच्या धान्याचे नुकसान झाल्यास कोटी रुपयांचा विमा काढण्यात आलेला असतानाही शेतकऱ्यांना त्यांचा काहीही फायदा होत नसून विमा कंपनीचे हीत बाजार समिती जोपासत असल्याचे दिसून येते.
कृषी उत्पन्न बाजार समितीने शासन स्तरावर भविष्यात शेतकऱ्यांच्या धान्याचे नुकसान झाल्यास कोटी रुपयांचा विमा काढण्यात आलेला असतानाही शेतकऱ्यांना त्यांचा काहीही फायदा होत नसून विमा कंपनीचे हीत बाजार समिती जोपासत असल्याचे दिसून येते.तेव्हा शेतकऱ्यांचे ओले झालेल्या धान्याचे तात्काळ पंचनामे करून नुकसानाची रक्कम भरपाई मिळावी याकरिता आपल्या स्तरावरून आवश्यक ती कार्यवाही करावी अन्यथा आपली प्रशासनास कोणतीही
पूर्वसूचना न देता आंदोलन करण्यात येईल यादरम्यान उद्भवलेल्या समस्या सर्वस्वी आपली प्रशासन जबाबदार असेल.या आंदोलनाचे नेतृव युवक शेतकरी सोपान गुडधे शेखर औगड ,उमेश महिंगे,सुधीर बोबळे,प्रवीण मोहोड ,समीर जवंजाळ,अनिकेत जावरकर,विजय मंडाले ,विकास देशमुख ,किरण महल्ले,दिनकर सुंदरकर ,सत्यजीत राठोड ,उमेश वाकोडे ,संकेत भुगुल,अजिंक्य वानखड़े,अमोल भारसाकळे ,अक्षय साबळे,योगेश देशमुख ,शाम गवळी ,यशवंत गुडधे ,राजेंद्र तायडे, अनुप राहाटे श्रीकांत भेटाळू ,हरीश अग्रवाल,संजय लव्हाळे या सह शेतकरी उपस्थित होते.
Published on: 20 June 2022, 09:12 IST